Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Misuse of Government Funds: बॅंकेला वैयक्तिक माहिती जोडण्याचे आदेश वरिष्ठांचेच; ‘एसएओ’ गोविंद मोरे यांचा युक्तिवाद

Agriculture Officer Govind More: कृषी खात्याच्या अनुदानाची कोणतीही रक्कम मी माझ्या वैयक्तिक बँक खात्यात वर्ग केलेली नाही. उलट वैयक्तिक भ्रमणध्वनी बॅंकेला जोडावा, असे आदेश वरिष्ठांनीच मला दिले होते.

मनोज कापडे

Pune News: कृषी खात्याच्या अनुदानाची कोणतीही रक्कम मी माझ्या वैयक्तिक बँक खात्यात वर्ग केलेली नाही. उलट वैयक्तिक भ्रमणध्वनी बॅंकेला जोडावा, असे आदेश वरिष्ठांनीच मला दिले होते. या प्रकरणात बाजू मांडण्याची संधी न देताच दक्षता पथकाचा पदभार काढून घेणे अन्यायकारक ठरले आहे, असा जोरदार युक्तिवाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) गोविंद मोरे यांनी केला आहे.

कृषी खात्याच्या अनुदान रकमा सरकारी बॅंक खात्यातून थेट वैयक्तिक बॅंक खात्यात वर्ग केल्याचा ठपका कृषी आयुक्तांनी श्री.मोरे यांच्यावर ठेवला आहे. या प्रकरणी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी श्री.मोरे यांची प्राथमिक चौकशी केली आहे. या प्रकरणात तथ्य असल्याचा अहवाल काटकर यांनी देताच श्री. मोरे यांना दक्षता पथकातून हटविण्यात आले आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सहसंचालक श्री. काटकर यांनी माझी चौकशी सद्सदविवेकबुद्धीने चौकशी केली नाही, असे सांगत श्री. मोरे यांनी स्वतःवरील सर्व आरोप नाकारले आहेत. निवृत्तीला केवळ दहा महिने शिल्लक असताना काही अधिकाऱ्यांनीच संगनमत करीत आपल्याला बदनाम करण्याचा खटाटोप केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

‘एक रुपयादेखील काढलेला नाही’

‘‘कृषी विभागाच्या आहंरण व संवितरण अधिकाऱ्यांनीच मला माझी वैयक्तिक माहिती वर्धा येथील कृषी विभागाच्या बॅंक खात्याला जोडण्यासाठी पत्र दिले होते. त्यानंतर माझी बदली वर्ध्याहून चंद्रपूर जिल्ह्यात झाली. त्यामुळे माझ्यानंतर आलेल्या अधिकाऱ्याने त्याची वैयक्तिक माहिती बॅंकेत देण्याची आवश्यकता होती. परंतु या अधिकाऱ्याने तसे केले नाही. त्यामुळे उलट माझी वैयक्तिक रक्कम कृषी कार्यालयाच्या बॅंक खात्यात जमा झाली. कार्यालयीन बॅंकेच्या खात्यातून माझा भ्रमणध्वनी क्रमांक काढून टाकण्याची मागणी करूनही क्रमांक का हटविला नाही, याचे कारण मला अद्यापही समजलेले नाही,’’ असेही श्री. मोरे यांनी नमूद केल्याचे सांगितले जात आहे.

हिंगणघाटचा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या बॅंक खात्याला माझा वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांक संलग्न आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु या खात्यातून मी एक रुपयाचा देखील व्यवहार केलेला नाही. त्यामुळे मी घोटाळा केल्याचा आरोपदेखील बिनबुडाचा आहे, असे सांगत श्री. मोरे यांनी बॅंकेचे विवरणपत्र कृषी आयुक्तांना सादर केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मूळ गैरव्यवहार संभाजीनगरात झाला

कृषी खात्याच्या रकमा वैयक्तिक बॅंक खात्यात वळविण्याचा प्रकार माझ्याकडून नव्हे; तर छत्रपती संभाजीनगरात झाला होता. तेथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात लिपिकाने स्वतःचा भ्रमणध्वनी बॅंकेच्या खात्याला जोडून कोट्यवधी रुपयांच्या रकमा काढल्या होत्या. लिपीक घोटाळा करतो म्हणून यामुळे वरिष्ठ कार्यालयांनीच अधिकारी म्हणून मला स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक कृषी कार्यालयाच्या बॅंक खात्याला जोडण्याचे आदेश दिले होते, असा दावा श्री.मोरे यांनी केल्याचे सांगितले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Farm Loan Waiver GR: कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल तर माफ होणार का?; 'एकवेळ समझोता' योजना काय आहे?

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

SCROLL FOR NEXT