Nagar News Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar News : नगरला मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे. लिंगगुणोत्तराचे हे प्रमाण वाढीसाठी व मुलगा-मुलगी हा भेदभाव समाजातून नष्ट करण्यासाठी प्रभावी कृती कार्यक्रम राबवा.

नगर जिल्ह्यातील सोनेग्राफी सेंटरच्या माध्यमातून अवैधरीत्या स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार होत असतील तर या प्रकाराला आळा घालण्यासाठी सोनेग्राफी केंद्रावर अचानक धाडी टाकून तपासणी करण्यात याव्यात, अशा सूचना महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिल्या आहे.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. बी. वरूडकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, जिल्हा संरक्षण अधिकारी दीपक पाटील, संध्या रशीनकर आदी उपस्थित होते.

मुलांच्या तुलनेत मुलींच्या लिंगगुणोत्तराचे प्रमाण कमी होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, त्यामुळे हे प्रमाण प्रभावी कृती कार्यक्रम राबविण्या बरोबरच स्त्रीभ्रृणहत्येचे प्रकार थांबविण्यासाठी सोनेग्राफी केंद्राची तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करत पीसीपीएनडीटी कायद्याची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी व्हावी.
रूपाली चाकणकर, अध्यक्षा, महिला आयोग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection : नांदेड जिल्ह्यात आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Dam Water Levels : लघू प्रकल्पात १२, मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा

Road Protest : सासुरे-कौठाळी रस्त्यासाठी ‘रास्ता रोको’

Water Scarcity : पाणीटंचाई टाळण्यासाठी वर्षभराचे नियोजन करा; पालकमंत्री जयकुमार गोरे

Goat Farming : शास्त्रीय व्यवस्थापनातून शेळीपालनात शाश्वत उत्पन्न

SCROLL FOR NEXT