Silk Fund Market Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Fund Market : सोलापुरच्या हिरज येथेच सुरू होणार रेशीम कोषाची खरेदी मार्केट; शेतकऱ्यांची थांबणार वणवण?

Solapur Hiraj Market : जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटली असून आता जिल्ह्यातच रेशीम कोश खरेदी-विक्री बाजारपेठ सुरू होणार आहेत. ही बाजारपेठ शहरालगतच्या हिरज येथे यंदा सुरू होणार असून शेतकऱ्यांची होणारी वणवण आता थांबणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : जालन्यानंतर सोलापूरमध्ये रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ सुरू होणार असून ती शहरालगत असणाऱ्या हिरज येथे होईल. यामुळे जिल्ह्यातील १५५ गावांतील ८१९ तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच हिरज येथे सुरू होणाऱ्या मार्केटमुळे राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची होणारी वणवण देखील थांबणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल हा खरीप हंगामातील शेतीसह तुती लागवडीकडे वाढताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यातील १५५ गावांतील ९७८ एकर जमिनीवर तुतीची लागवडी केली जाते. यात ८१९ शेतकरी गुंतले असून यंदा यात आणखी वाढ झाली आहे.

जिल्ह्यात यंदा ४०० शेतकऱ्यांनी नोंद केली असून या शेतकऱ्यांनी ५०० एकर पेक्षा अधिक जमिनीवर तुती लागवड करण्याची तयारी दर्शवल्याचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी म्हटले आहे. 

तुती लागवड क्षेत्र एक हजार हेक्टरपर्यंत

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक वेळा बसला आहे. येथे पाऊस, वादळ-वारे, आणि गारपीटमुळे रब्बीसह खरीप पीकाचे नुसकान होते. पण तुतीच्या पिकाचे नुकसान होत नाही. यामुळे जिल्ह्यात तुतीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. तर जिल्ह्यातील तुती लागवडीचे क्षेत्र हे १ हजार हेक्टरच्या बाहेर गेले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Suvendu Adhikari CM Oath Ceremony: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ, पंतप्रधान मोदींची उपस्थिती

FPC Success Story: परदेशी भाज्यांमधील शेतकरी कंपनी पोहोचली देशातील महानगरांपर्यंत

Marathi Language: लोकभाषेतील शब्दशिदोरी

Khandesh Heatwave Crisis: खानदेशात केळीबागा वाचविण्याची धडपड

Monsoon Rain: पाऊस, पाणी अन्‌ पिके

SCROLL FOR NEXT