Mango Season Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Season : आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सपुंष्टात

Mango Market : मॉन्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : मॉन्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आला आहे. त्यामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची विभागणी पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन विभागांत होते. पश्‍चिम विभागात किनारपट्टीचे देवगड, मालवण आणि वेंगुर्ला असे तालुके येतात.

याशिवाय कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यातील काही भाग येतो. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यांचा बहुतांशी भाग पूर्वपट्ट्यात येतो. या तालुक्यातील अनेक गावे डोंगरपायथ्याशी आहेत. किनारपट्टीच्या भागातूनच आंब्याची पहिली पेटी या वर्षी १६ नोव्हेंबरलाच आंबा पेटी दाखल झाली होती.

त्यानंतर मार्चपासून मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला. या भागातील आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. परंतु पूर्वपट्ट्यातील आंब्याला या वर्षी मार्चमध्ये मोहर आला. मोहर आल्यानंतर किमान ८० ते ९० दिवस आंबा परिपक्व होण्यासाठी कालावधी लागतो. त्यामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा १५ मेनंतर परिपक्व होण्याचा अंदाज होता.

परंतु तत्पूर्वीच ११ मे रोजी जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात विजांचा गडगडाट, वादळीवाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. त्यानंतर सलग तीन चार दिवस या भागांत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या भागांतील आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आला आहे.

पश्‍चिम पट्ट्याच्या तुलनेत या भागात आंबा लागवड कमी आहे. परंतु तरीदेखील हजारो शेतकरी आंबा उत्पादनावर अवलंबून आहेत. पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT