Mahayuti Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : महायुतीचा सत्ता स्थापनेचा दावा

Mahayuti Establishment of Power : भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर महायुतीच्या सर्व पक्षांनी राज्यपाल सी. राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला.

Team Agrowon

Mumbai News : भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर महायुतीच्या सर्व पक्षांनी राज्यपाल सी. राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. या वेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी,

अशी शिफारस करणारे पत्र राज्यपालांना सादर केल्याचे सांगितले. तसेच मंत्रिमंडळात सहभागाबाबत त्यांनी संदिग्धता कायम ठेवत याचा निर्णय सायंकाळी उशिरापर्यंत घेऊ, असेही सांगितले.

महायुतीच्या नेत्यांची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, प्रफुल्ल पटेल, विनय कोरे, रवींद्र चव्हाण, उदय सामंत, चंद्रकांत पाटील, संजय शिरसाठ यांच्यासह अन्य नेत्यांनी राजभवनावर राज्यपाल सी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.

तसेच या वेळी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) समर्थनाचे पत्रही दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचे सांगितले.

फडणवीस म्हणाले, ‘‘आम्ही सत्ता स्थापनेबाबत राज्यपालांना पत्र दिले आहे. उद्या (ता. ५) सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होईल. आमच्यासमवेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्ती पक्ष, युवा स्वाभिमान, रासप आणि अपक्ष असल्याने मोठी महायुती झाली आहे.

या सगळ्यांच्या सहीचे पत्र आम्ही दिले आहे. शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी माझ्या समर्थनार्थ पत्र दिले. माझा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी करावा, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांनीही त्याच आशयाचे पत्र दिले आहे.’’

फडणवीस यांच्या शिफारशीचा मला आनंद : शिंदे

अडीच वर्षांपूर्वी येथेच माझ्या नावाची शिफारस फडणवीस यांनी केली होती. आज मी त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून शिफारस करताना मला आनंद होत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणले. खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे. आम्ही टीम म्हणून काम करू. फडणवीस यांना मोठा अनुभव आहे. त्यांच्या नावाची शिफारस केल्याचा आनंद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT