12th Results Agrowon
ॲग्रो विशेष

12th Results : विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीच्या निकाल मंगळवारी

Update on 12th result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या यंदाच्या बारावीच्या परिक्षेचा निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. १२वीचा निकाल आता एका दिवसावर आला असून यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या यंदाच्या यंदाच्या बारावीच्या परिक्षेचा निकाल हा लवकरच जाहिर होणार आहे. याबाबत मंडळाकडून माहिती देण्यात आली असून तो मंगळवारी जाहीर केला जाईल. तसेच तो विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. 

बारावीच्या निकालाबद्दल माहिती देताना, बोर्डाने निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in ही साईट दिली आहे. येथे जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून लागेली निकालाची आतुरता आता संपुष्टात येणार आहे. निकाल मंगळवारी जरी घोषीत होत असला तरी प्रत्यक्ष मार्कशीट किमान १० दिवसानंतर विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे. याबाबत देखील माहिती बोर्डाकडून दिली जाणार आहे. 

निकाल कसा पाहाला? 

विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या साईटवर जाऊन Maharashtra SSC and HSC result येथे क्लिक करावे. यानंतर विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा क्रमांक टाकून तो सबमिट करावा. या प्रोसेसनंतर विद्यार्थ्याला बारावीचा निकाल समोर येईल. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून राज्यातील ९ विभागात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. जी २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ दरम्यान झाली. ही परीक्षा पुणे, मुंबई, कोकण, औरंगाबाद, नाशिक, लातूर, नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती विभागात झाली होती. 

कोणत्या आहेत वेबसाईट?

बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या साईटवर पाहता येणार आहे. तसेच mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, results.gov.in. सह hsc.mahresults.org.in या साईटवर देखील निकाल पाहता येणार आहे. 

पुरवणी परीक्षा 

दरम्यान जे विद्यार्थी यंदा पास होऊ शकणार नाहीत त्यांचासाठी जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी २७ मे २०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी स्वतंत्र माहिती मंडळाकडून देण्यात येणार आहे. 

यंदा १५.१३ लाख विद्यार्थी परिक्षार्थी

यंदा बारावीची परीक्षेला १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये विज्ञान, कला, वाणिज्य आणि शाखे व्यावसायिक अभ्यासक्रम आणि आयटीआयचा समावेश होता. यात ७ लाख ६० हजार ४६ विद्यार्थी विज्ञान शाखा, तीन लाख ८१ हजार ९८२ विद्यार्थी कला शाखा, व्यावसायिक अभ्यासक्रमातून ३७ हजार २२५, आयटीआयचे ४ हजार ७५० विद्यार्थी आणि ३ लाख २९ हजार ९५० वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales: मॉन्सूनमुळे ट्रॅक्टर विक्रीला 'बुस्ट'; गेल्यावर्षीच्या तुलनेत विक्री वाढली

Micronutrients Management : पीकवाढीसाठी मंगल, तांबे आवश्यक

Sushila Karki: सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान

Drone Subsidy Scheme: ड्रोन खरेदीसाठी मिळणार ५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; जाणून घ्या संपुर्ण माहिती

Vermicopmpost Production : उभारला गांडूळ खत निर्मितीचा स्टार्टअप

SCROLL FOR NEXT