Flower Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

International Flower Exhibition : आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभ

Maharashtra Nurserymen's Association : महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन यांच्या वतीने भारतातील सर्वांत मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती, फ्लोरिकल्चर, आर्बोरिकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शन गुरुवारी (ता. २१) सुरू होत आहे.

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन यांच्या वतीने भारतातील सर्वांत मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती, फ्लोरिकल्चर, आर्बोरिकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शन गुरुवारी (ता. २१) सुरू होत आहे. हे प्रदर्शन रविवार (ता. २४)पर्यंत सुरू राहणार आहे. पुणे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर (सिंचन नगर) हे प्रदर्शन पार पडणार आहे.

पुणे येथे सोमवारी (ता. १८) पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने, महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशन अध्यक्ष शशिकांत चौधरी, सचिव आनंद कांचन, मनोज देवरे, अशोक भुजबळ, राजेंद्र चव्हाण, सुनील चोरगे, महिपाल राणा, नेहा त्यागी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनाचे उद्‌घाटन सकाळी अकरा वाजता सीमा सुरक्षा दलाचे उपायुक्त राजा बाबू सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक विजय बोत्रे, पुणे पुलाच्या संस्थापक सोनिया कोंजेटी, निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे आणि यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे अध्यक्ष सुभाष चंद्रकांत जगताप हे असणार आहेत.

प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी होणार असून, या वेळी हॉर्टिकल्चर तज्ज्ञ हे शेतकरी आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार असून सकाळी १० ते ७ पर्यंत पुणेकरांना पाहता येणार आहे. तरी जास्तीत जास्त पुणेकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT