Flower Exhibition : पुण्यात एम्प्रेस गार्डनमध्ये भरलं पुष्प प्रदर्शन

Mahesh Gaikwad

एम्प्रेस गार्डन

पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये २५ जानेवारीपासून 'फ्लॉवर शो बड्स एन ब्लूम्स २०२४' पुष्प प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

पुष्प प्रदर्शन

या पुष्प प्रदर्शनामध्ये पुणेकरांना वेगवेगळ्या फुले पाहण्याची संधी मिळणार आहे.

प्रताप पवार

या प्रदर्शनाच्या उद्घााटन प्रसंगी द अ‍ॅग्री - हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष प्रताप पवार उपस्थित होते.

बोन्साय झाडे

प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय झाडे यांची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली आहे.

नर्सरी साहित्य

तसेच नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थाचे असे विविध स्टॉल येथे आहेत.

फुलांची आकर्षक सजावट

या पुष्प प्रदर्शनात पाण्याचा हौद बनवून त्यावर फुलांच्या सहाय्याने देवीची प्रतिकृती काढण्यात आली आहे जे पाहण्यास नागरिक गर्दी करित आहेत.

फुलांची कलात्मक मांडणी

फुलांची कलात्मक मांडणी, भाजीपाला स्पर्धा, आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करणे, इ. गोष्टींच्या स्पर्धा या निमिताने आयोजित करण्यात येतात.