Heavy Rain Warning Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Warning : आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला मुसळधारा; चेन्नईसह चार जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशभरात जोरदार मान्सून बरसल्याने यंदा शेतीसह पिण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. आता परतीच्या पावसाचे दिवस मौसम संपला आहे. यादरम्यान दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. यादरम्यान भारतीय हवामान विभागाने देशातील १० राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे तामिळनाडू सरकारने राज्यातील चार जिल्ह्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला मुसळधारा

दरम्यान भारतीय हवामान खात्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तामिळनाडू सरकारने राज्यातील चार जिल्ह्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. यामुळे चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपुट्टूमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

आपत्ती व्यवस्थापन पथक स्टँडबायवर

तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसह दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज पाहता तामिळनाडू सरकारने मदत आणि बचावासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. चेन्नईच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये २६ ठिकाणी राज्य आणि केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांना तैनात करण्यात आले आहे. तसेच २१९ बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nayab Singh Saini Oath Ceremony : हरियाणात दुसऱ्यांदा नायब सिंग सैनी राज!, सैनी झाले हरियाणाचे मुख्यमंत्री

Crop Advisory : कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

Beetroot Foods : बिटापासून जॅम, जेली, बिस्किटे

Mustard Cultivation : सुधारित पद्धतीने मोहरी लागवड

Chana Cultivation : हरभरा लागवडीसाठी निवडा सुधारित वाण

SCROLL FOR NEXT