Humani Weevil Agrowon
ॲग्रो विशेष

Humani Weevil: मार्चमध्येच हुमणीचे भुंगे दिसले; धोका वाढला!

Climate Change Impact: सामान्यतः वळीव पावसानंतर दिसणारे हुमणीचे भुंगे यंदा मार्चमध्येच आढळले, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी धोका वाढला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, हा किडीचा मोठा प्रादुर्भाव होण्याचा संकेत असून, ऊस आणि इतर पिके वाचवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आवश्यक आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: प्रत्येक वर्षी वळीव पावसानंतर आढळणारे हुमणीचे भुंगेरे यंदा मार्चमध्ये पाऊस नसतानाही आढळत आहेत. लवकर भुंगे येत असल्याने यंदा हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आणि लवकरच होण्याची भीती अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही परिस्थितीत यंदा शेतकऱ्यांना उसासह अन्य पिकांना वाचवण्यासाठी हुमणीचे व्यवस्थापन लवकर करावे लागण्याची चिन्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागामध्ये यंदा हुमणीचा त्रास लवकर सुरू होईल, अशी शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे हुमणी किडीची जीवनशैलीही बदलली आहे.

पूर्वीच्या काळामध्ये वळीवाचा पाऊस झाल्यानंतर जमिनीतून भुंगेरे बाहेर येत असत. नर व मादी यांचे मीलन होऊन मातीमध्ये अंडी घातली जायची. या पार्श्‍वभूमीवर मार्चमध्येच भुंगेरे बाहेर येऊन नर- मादी मीलन व त्यातून पुढील पैदास सुरू झाली तर पुढील काळामध्ये प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. शेतकऱ्यांनी किडीचा जीवनक्रम समजून घेऊन तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

शरद कृषी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, सध्या कृषी निविष्ठा उद्योजक असलेले कृषी कीटकशास्त्र तज्ज्ञ डॉ. शांतीकुमार पाटील यांनी हुमणीच्या बदललेल्या जीवनचक्राबाबत अभ्यास केला आहे. कोल्हापूर तसेच सांगली भागातील ऊसपट्ट्यात त्यांना मार्चमध्येच भुंगेरे आढळले आहेत.

बदलत्या हवामानामुळे हुमणीचा जीवनक्रम बदलला आहे. ‘ओव्हरलॅपिंग जनरेशन’ पद्धतीने या किडीचे जीवनचक्र सुरू आहे. सध्या करीत असलेल्या प्रयोगांमध्ये प्रति बल्ब आठ ते दहा भुंगेरे आकर्षित होत असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे पाटील म्हणाले. काही वर्षांचा अभ्यास केल्यास अंडी घालण्याचा कालावधी बाराही महिने सुरू असल्याचे ते सांगतात.

येथून पुढील काळात शेतकऱ्यांना किडीचा बंदोबस्त करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा प्राधान्याने वापर करावा लागणार आहे. प्रकाश सापळे लावण्यासारखे प्रयोग लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. भुंगेरे दिसणे हेच हुमणीचा पुढील मोठा प्रादुर्भाव होण्याचे संकेत असून गंध सापळे व अन्य उपाययोजनाही तातडीने करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT