Shivraj Singh Chauhan Agrowon
ॲग्रो विशेष

Shivraj Singh Chauhan : सरकार मसूर, उडीद, तूर दाळ खरेदी करणार

Masoor, Urad, Tur Update : ‘‘सरकार शेतकऱ्यांकडून तूर, उडीद आणि मसूर दाळीची खरेदी करेल,’’ अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी (ता. २६) राज्यसभेत दिली.

Team Agrowon

New Delhi : ‘‘सरकार शेतकऱ्यांकडून तूर, उडीद आणि मसूर दाळीची खरेदी करेल,’’ अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी (ता. २६) राज्यसभेत दिली.

शेतकऱ्यांनी ई-समृद्धी प्लॅटफॉर्मवर नोंदणी केल्यानंतर त्यांच्याकडून ही खरेदी करण्यात येईल, असेही श्री. चौहान म्हणाले. राज्य सभेत एका पुरवणी प्रश्‍नावर उत्तर देताना चौहान यांनी ही माहिती दिली.

श्री. चौहान म्हणाले, ‘‘सरकारने किमान आधारभूत किमती (एमएसपी) अंतर्गत सर्वाधिक शेतीमाल खरेदी केला आहे. कॉंग्रेस सरकाच्या काळात २००३-०४ आणि २०१३-१४ दरम्यान केवळ ४५ कोटी टन शेतीमाल किमान आधारभूत किमतीने खरेदी केला होता.

रालोआ सरकारने मात्र २०१४-१५ आणि २०२३-२४ या काळात एकूण ६९.१८ कोटी टन इतका शेतीमाल खरेदी केला आहे. स्वामिनाथन समितीच्या शेतकऱ्यांना ५० टक्के नफा देण्याच्या शिफारशीकडे यूपीए सरकारने दुर्लक्ष केले.’’

या वेळी ‘द्रमुक’चे एम. षणमुगम यांनी चहा आणि कॉफी ‘एमएसपी’अंतर्गत आणावी, अशी मागणी केली. यावर २३ पिकांसाठी ‘एमएसपी’ दिला जातो. चहा आणि कॉफीचा विषय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या खात्यांतर्गत येत असल्याचे उत्तर चौहान यांनी दिले.

या विषयी वाणिज्य आणि उद्योग आणि कृषी मंत्रालय एकत्रपणे चर्चा करून तोडगा काढेल, अशी अपेक्षा राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT