Road Development  Agrowon
ॲग्रो विशेष

Road Development Fund : सरकारने धुळ्यातील मंजूर रस्त्यांबाबतची स्थगिती उठविली

महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत धुळे तालुक्यासाठी मंजूर ४२ कोटींच्या निधीतील रस्त्यांच्या कामाला सत्तापरिवर्तनानंतर शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती.

Team Agrowon

Dhule News : महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत धुळे तालुक्यासाठी मंजूर ४२ कोटींच्या निधीतील रस्त्यांच्या कामाला सत्तापरिवर्तनानंतर शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. याप्रश्‍नी लोकप्रतिनिधींनी सतत पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने स्थगिती उठविली आहे.

धुळे तालुक्यात रस्त्यांची कामे व्हावीत आणि नादुरुस्त रस्त्यांची सुधारणा होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. त्यात अपेक्षित रस्तेकामांचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याची सूचना दिली होती.

त्यानुसार रस्ते सुधारणेबाबत सरकारला प्रस्ताव सादर झाला. अशा कामांना मंजुरी मिळावी आणि त्यांचा अर्थसंकल्पात समावेश व्हावा यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत धुळे तालुक्यातील अपेक्षित रस्ते सुधारकामी एकूण ४१ कोटी ७७ लाखांचा निधी मंजूर झाला.

स्थगिती उठविलेले रस्ते (खर्च रुपयांत)

धुळे तालुका : धुळे ते बिलाडी रस्ता (एक कोटी ३० लाख), कौठळ फाटा ते कापडणे (दोन कोटी १५ लाख), बाबरे ते जळगाव जिल्हा हद्दीदरम्यान स्लॅब ड्रेनचे बांधकाम (अडीच कोटी), कापडणे ते कौठळ रस्ता (साडेतीन कोटी), कौठळ फाटा ते तालुका हद्द रस्ता (साडेतीन कोटी), बोरीस ते निकुंभे रस्ता (दोन कोटी), सायने ते देवभाने रस्ता (अडीच कोटी),

मेहेरगाव ते खेडे रस्ता (दोन कोटी ३५ लाख), निमडाळे ते खेडे रस्ता (अडीच कोटी), वेल्हाणे ते आर्वी-पारोळा रस्ता (७६ लाख), शिरढाणे ते नावरा रस्ता सुधारणा (दोन कोटी २८ लाख), धमाणे ते बिलाडी रस्ता (एक कोटी ९० लाख), बिलाडी ते निमखेडी रस्ता (दोन कोटी ८५ लाख),

बोरकुंड ते झोडगे रस्ता (दोन कोटी ८५ लाख), मोहाडी प्र. डां. ते जिल्हा हद्द रस्ता (९५ लाख), निमडाळे-वार-कुंडाणे रस्ता सुधारणा, लहान पूल, पाइप मोरीचे बांधकाम (दोन कोटी ८५ लाख), नावरा गाव रस्ता काँक्रिटीकरण (दोन कोटी १८ लाख), मांडळ गावात काँक्रिट रस्ता (दोन कोटी ८५ लाख).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shetkari Karjmafi: १ जुलैपर्यंत कर्जमाफी योजनेची घोषणा करु, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती

Winter Care: थंडीमध्ये फळझाडांची काळजी घेण्यासाठी सोपे उपाय कोणते?

Unproductive Cattle: गोवंशासाठी शेतकऱ्यांना अनुदान देणे शक्य नाही; भाकड जनावरांच्या प्रश्नावरुन सरकारचे उत्तर

Human Wildlife Conflict: रोगापेक्षा उपाय घातक

Sustainable Agriculture: शेती शाश्‍वत करण्यावर भर देणार

SCROLL FOR NEXT