Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Water Bill : वाढीव पाणीपट्टीबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने

Department of water resources : ‘‘जलसंपदा विभागाने शेतीसाठी आकारल्या जाणाऱ्या पाणीपट्टी दरात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

Team Agrowon

Nashik News : ‘‘जलसंपदा विभागाने शेतीसाठी आकारल्या जाणाऱ्या पाणीपट्टी दरात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. मात्र आमचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी आयोजिलेल्या बैठकीसाठी ते शनिवारी (ता. २२) नाशिक दौऱ्यावर आले होते. राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीचे दर दहापट वाढविले आहेत.

२०१८- १९ मध्ये बारमाही पिकांसाठी पाणीपट्टीचा दर हा स्थानिक करांसह वार्षिक एकरी ५३८ रुपये होता. नवीन दरवाढीनुसार हा दर बागायती शेतकऱ्यांसाठी वार्षिक एकरी ५ हजार ४४३ रुपये, खरिपाच्या शेतकऱ्यांसाठी पाणीपट्टी १ हजार ८९०, रब्बीसाठी ३ हजार ७८० रुपये करण्यात आली आहे.

एका झटक्यात दहापट झालेली ही दरवाढ बागायतदार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. ‘‘हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार करेल,’’ असे आश्‍वासन श्री. शिंदे यांनी दिले.

‘लक्ष्मण हाकेंचे आभार’’

लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण १० दिवसांनंतर स्थगित केले. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हाके यांनी आंदोलन मागे घेतले, त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT