Dhangar Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर सह्याद्रीवरील बैठक निष्फळ ; सरकारने मागितली दोन महिन्यांची मुदत

Sahyadri Meeting : धनगर आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी सरकारच्यावतीने अभ्यास करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे.

Swapnil Shinde

Dhangar Community Aggressive : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचा आज १६ वा दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे. त्यामुळे राज्यात धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न तापला आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी आज मुबंईत सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. परंतु या बैठकीत तोडगा निघू न शकल्याने उपोषण सुरू ठेवण्यावर आंदोलक ठाम आहेत. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरल्याची चर्चा आहे.

धनगर समाजाला एसटी संवर्गात समाविष्ट करावं, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या प्रश्नी सह्याद्री अतिथिगृहावर धनगर आरक्षणप्रश्नी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आ. गोपीचंद पडळकर, राम शिंदे, दत्तात्रय भरणे व इतर धनगर समाजातील नेते उपस्थित होते.

या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही. तोपर्यंत एसटीच्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू केल्या आहेत. याप्रश्नी सरकार संवेदनशील आहे. हा प्रश्न लवकर सुटण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी दोन महिन्यांची वेळ द्यावी, अशी विनंती आंदोलकांना करण्यात आली.

परंतु, आंदोलन आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आमचा ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार”, अशी प्रतिक्रिया बयशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ाळासाहेब दोडतोले यांनी दिली.

या बैठकीनंतर गोपीचंद पडळकर म्हणाले “आम्ही चार राज्यांचे जीआर दाखवले. राज्य सरकार दोन दिवसात धनगर आणि धनगड याचा अभ्यास करण्यासाठी दोन दिवसात समिती नेमणार आहे. सरकारने दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. ज्या राज्यात या सुधारणा करण्यात आल्या त्या राज्यात समिती जाऊन अहवाल तयार करणार आहे”,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2025: 'मनरेगा'चे नाव बदलण्यावरुन विरोधक आक्रमक, संसद परिसरात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने

Kardai Mava Kid: करडईवरील काळ्या माव्याचं नियंत्रण कसं कराल?

Animal Health Care: मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका ठरतेय फायदेशीर

Hapus Mango Butter: हापूसच्या कोयींपासून तेल अन् मँगो बटर

Climate Crisis: करे कोई, भरे कोई...!

SCROLL FOR NEXT