Cotton Ginning Process  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Ginning Process : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड धीमीच

Cotton Processing Update : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी मागील २०-२२ दिवसांपासून सुरू झाली. पण पावसामुळे कापूस प्रक्रिया रखडली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी मागील २०-२२ दिवसांपासून सुरू झाली. पण पावसामुळे कापूस प्रक्रिया रखडली आहे. खानदेशात अद्याप ९५ टक्के जिनिंग प्रेसिंग कारखाने बंद आहेत. तर काही आघाडीचे कारखाने सुरू आहेत. पण तेथेही प्रक्रिया १०० टक्के क्षमतेने सुरू नसल्याची स्थिती आहे. कापूस बाजार अस्थिर झाल्यानेही काही कारखानदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.

कापसाची खेडा किंवा थेट खरेदी खानदेशात केली जाते. ही खेडा खरेदी दिवाळी, कोजागरी पौर्णिमेच्या काळात गती घेते. दसऱ्यापाठोपाठ आता दिवाळी सणही पावसातच जाईल, असे दिसत आहे. यामुळे कापसाचा दर्जाही खराब होत आहे. कापूस वेचणीवर येताच पावसाचा धुमाकूळ वाढला आहे. यामुळे कापसाची आवकही कमी आहे. दुसरीकडे कापसाची खेडा खरेदीही सुरू झालेली नाही. काही भागांत मागील हंगामातील साठवलेला कापूस शेतकऱ्यांकडे आहे. पण कापूस दर अस्थिर झाल्याने त्याची विक्रीही थांबली आहे.

खानदेशात सुमारे ११३ जिनिंग प्रेसिंग कारखाने आहेत. त्यात कापसापासून सरकी व रुई तयार केली जाते. हे कारखाने सर्वत्र खासगी व्यवस्थापनाचे आहेत. यातील काही कारखाने वित्तीय व अन्य अडचणींमुळे बंद आहेत. सुमारे ८० ते ८५ कारखाने दर वर्षी खानदेशात कापसावर प्रक्रिया करतात. एका कारखान्यास रोज किमान ८० ते ९० क्विंटल कापसाची गरज असते. परंतु कापसाची आवक कमी आहे. तसेच पावसामुळे अनेक कारखान्यांत प्रक्रिया करताना नुकसानीची भीती आहे.

गाठींच्या निर्मितीला फटका शक्य

कापसाच्या पिकाची मोठी हानी पावसाने होत आहे. पूर्वहंगामी कापसासह कोरडवाहू कापूसही पाण्यात आहे. खानदेशात दर वर्षी २२ ते २४ लाख कापूस गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) केली जाते. परंतु यंदा एवढ्या गाठींची निर्मिती अशक्य असल्याचे चित्र खानदेशात आहे.

अस्थिर कापूस बाजार, पावसामुळे घसरलेला कापसाचा दर्जा, ठप्प असलेली खेडा खरेदी आदी कारणांमुळे कापसावर खानदेशात प्रक्रियेने अजून गती घेतलेली नाही. पुढे दिवाळीचा सण आहे. यामुळे पुढील महिन्यात जिनिंग प्रेसिंग कारखाने गतीने सुरू होतील, असे दिसत आहे.
अनिल सोमाणी, संचालक, खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT