Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी धरणातून १५ डिसेंबरला पहिले आवर्तन सोडणार

Ujani Dam Water Storage : जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण यंदा शंभर टक्के भरले असून, धरणात सध्या १२३ टीएमसी इतके पाणी आहे.

Team Agrowon

Solapur News: जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण यंदा शंभर टक्के भरले असून, धरणात सध्या १२३ टीएमसी इतके पाणी आहे. कालव्याला सोडण्यात येत असलेले पाणी उद्या मंगळवारी (ता. १५) बंद केले जाणार आहे. तर यंदाच्या रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन १५ डिसेंबरला सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

यंदा उजनी धरण शंभर टक्के भरले. अगदी सुरवातीपासून आता परतीच्या पावसापर्यंत सातत्याने पाऊस होत राहिला. मुख्यतः धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसाने धरणाने पाण्याच्या टक्केवारीची शंभरी गाठली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली आहे. त्यानंतर पूरनियंत्रणासाठी म्हणून उजनी धरणातून भीमा नदीतही आतापर्यंत सुमारे १०० टीएमसीहून अधिक पाणी सोडण्यात आले.

त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित राहिली. त्याचाच भाग म्हणून गेल्या ४ ऑगस्टपासून कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. त्याशिवाय दहिगाव, सीना-माढा योजनेलाही पाणी सोडण्यात येत आहे.

पण कालव्याचे पाणी उद्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आगामी रब्बी हंगामासाठी येत्या १५ डिसेंबरला पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे. तसेच या महिनाअखेर कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT