Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : क्रांतिअग्रणी कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता

कारखान्यांनी तयार केलेली वीज ही प्रदूषण विरहित असल्याने जुन्याच दराने ती शासनाने खरेदी केली पाहिजे.

Team Agrowon

Sangali News : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या (Dr. G. D. Bapu Lad Cooperative Sugar Factory) गाळप हंगामात ९ लाख ५६ हजार ३०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले. कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता झाली.

हा गाळप हंगाम शेतकरी, तोडणी व वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे पार पडला असल्याचे मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले.

येथील कारखान्याच्या गाळप हंगाम सांगता कार्यक्रमावेळी साखर पोत्यांचे पूजन आणि काटा पूजन प्रसंगी आमदार लाड बोलत होते. या वेळी उपाध्यक्ष उमेश जोशी, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे प्रमुख उपस्थित होते.

आमदार लाड म्हणाले, की यंदा कारखान्याने ९ लाख ३० हजार १६६ टन ऊस गाळप केला आहे. साखर पोत्यांचे उत्पादन १४३ दिवसांत झाले आहे. यंदा निव्वळ साखर उतारा १०.३१ टक्के आहे.

परंतु, इथेनॉल निर्मितीसाठी सिरप व बी हेवी मोलॅसिसमध्ये वळवलेल्या साखरेचा विचार करता साखर उतारा सुमारे १२.६५ टक्के येत आहे. परंतु हा साखर उतारा वसंतदादा साखर संस्था पुणे यांच्याकडून प्रमाणित करून घेतल्यावरच जाहीर करता येईल.

कारखान्यांनी तयार केलेली वीज ही प्रदूषण विरहित असल्याने जुन्याच दराने ती शासनाने खरेदी केली पाहिजे.

या वेळी कारखान्याच्या क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, नागेश पवार, मुकंद जोशी, संभाजी लाड, बबन निकम, वसंत लाड, जी. के. जाधव, ग्रामपंचायत सदस्य किरण लाड उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Improved Crop Variety : महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसित पिकांचे सुधारित वाण

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ नव्हे, हा तर स्वार्थपीठ महामार्ग : राजू शेट्टी

Dairy Farming Success : दुग्ध व्यवसायात अंमळनेरची प्रगती

Maharashtra Assembly Fight: महाराष्ट्र विधानसभा लॉबीमध्ये हाणामारी; आमदारांचे कार्यकर्ते भिडले, अटक आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप

Tree Plantation : सदाहरित वृक्ष लागवडीसाठी ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चा पुढाकार

SCROLL FOR NEXT