Maharashtra Sugarcane Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season Maharashtra : ऊस गाळप हंगामाची तारीख ठरली, पण ऊस उत्पादकांच्या समस्यांचं काय ?

Sugarcane Kolhapur : कारखान्यांची धुरांडी दिवाळीनंतरच पेटणार आहेत. तथापि तोडणी-ओढणी यंत्र आणून त्यांचे नियोजन करणे कारखान्यांसमोर आव्हान असेल.

sandeep Shirguppe

Sugarcane Crushing Season Challenges : कर्नाटकप्रमाणेच यावर्षी राज्यातील साखर हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सोमवारी (ता.२३) मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीचा साखर हंगाम १५ दिवस उशिराने सुरू होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे कारखान्यांची धुरांडी दिवाळीनंतरच पेटतील. परंतु तोडणी-ओढणी यंत्र आणून त्यांचे नियोजन करणे कारखान्यांसमोर आव्हान असेल.

पश्चिम महाराष्ट्रातील विशेषकरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ऊस हंगाम मात्र विविध समस्यांच्या गराड्यात अडकण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यातील उसाची ६०० कोटी रुपयांची थकीत जादाची रक्कम, ऊस दराचे आंदोलन आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ऊस हंगामाला अडथळे निर्माण होऊ शकतात.

सीमा भागातील कारखान्यांना तोटा

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या आधी कर्नाटकातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने गाळपास सुरूवात करतात. तर हंगामाच्या सुरूवातीलाच महाराष्ट्रात ऊस दराचे आंदोलन सुरू होते. त्यामुळे फायदा कर्नाटकातील साखर कारखाने घेतात. राज्य सरकारने मध्यस्थी करत ऊस दराची कोंडी तातडीने फोडून महाराष्ट्रातील ऊस महाराष्ट्रातील कारखान्यांनाच गाळपासाठी जावा, अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांसह कारखानदारांची असते. परंतु आंदोलनाच्या काळात दराचा प्रश्न तातडीने निकाली लागत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमा भागातील उस उत्पादकांना त्याचा फटका बसतो., असा आजवरचा अनुभव आहे.

१२० दिवसांचा हंगाम

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २३ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. यामध्ये १५ सहकारी तर ८ खासगी साखर कारखाने आहेत. जिल्ह्यातील एकूण गाळपासाठी उपलब्ध ऊस १६० लाख टन आहे. यामुळे हंगाम जास्तीत जास्त १२० ते १२५ दिवस चालेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतकरी संघटनांची भूमिका आणि पाऊस यावर हंगाम अवलंबून

यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे ऊस पीकही जोमात आहे. राज्याच्या काही भागात अजून मॉन्सून सुरू आहे, तर आठ-दहा दिवसांत परतीच्या पावसाची शक्यता आहे. अधूनमधून पाऊस होत असल्याने नदीकाठच्या ऊस पिकात ओलावा आहे. त्यात पाऊस झाल्यास ऊस तोडणीत अडथळा निर्माण होऊ शकतो. या बाबींचा विचार करून हंगाम दिवाळीनंतर सुरू करावा, अशी मागणी साखर उद्योगांशी संबंधित संघटनांनी केलेली होती. त्या मागणीचा विचार करून हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करण्यात येणार. परंतु शेतकरी संघटनांची भूमिका आणि पावसाची स्थिती यावर यंदाचा हंगाम कसा चालणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Crisis: अतिवृष्टी, महापुरात शेतकरी उघड्यावर

Agriculture Livestock Scheme: गाई-म्हशीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारची योजना

Water Management: धरण व्यवस्थापन संहिता

Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात

Maharashtra Agricultural Council: कृषी परिषदेला मिळेना पूर्णवेळ संचालक

SCROLL FOR NEXT