Sugarcane Harvesting Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : बारा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

Sugarcane Season : नगर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात खासगी आणि सहकारी कारखान्यांनी मार्चअखेर तब्बल १ कोटी ३० लाख टनापर्यंत गाळप केले.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात खासगी आणि सहकारी कारखान्यांनी मार्चअखेर तब्बल १ कोटी ३० लाख टनापर्यंत गाळप केले. एक कोटी २९ लाख क्विंटलपर्यंत साखर उत्पादन झाले आहे. आतापर्यंत ९.९१ साखर उतारा मिळाला.

मार्चअखेर १२ कारखान्यांचा हंगाम आटोपला आहे. उर्वरित कारखानेही एप्रिलच्या मध्यापर्यंत चालतील. मात्र, शेजारच्या बीड जिल्ह्यात ऊस शिल्लक आहे. त्यामुळे त्या परिसरातील कारखाने उसाच्या गाळपाशिवाय बंद करू नये, असे आदेश साखर आयुक्तांनी काढले आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील प्रमुख असलेले काळे, कोल्हे, ज्ञानेश्वर, मुळा, अशोक, विखे, अगस्ती, थोरात ही कारखाने अजून सुरू आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी उसाचे गाळप झाले आहे. शेजारील जिल्ह्यातूनही गाळपासाठी ऊस येत आहे. गतवर्षी ऊस जास्त असल्याने कारखाने एप्रिल अखेरपर्यंत सुरू होते.

गाळप बंद झालेले कारखाने

पीयूष, युटेक, गजानन महाराज, कुकडी सहकारी, क्रांती शुगर, सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे, अंबालिका, केदारेश्वर सहकारी, प्रसाद शुगर, बारामती अग्रो (हळगाव), गणेश सहकारी, ढसाळ (माळकुप).

सहसंचालक कार्यालय बेफीकीर

जिल्ह्यात साखर कारखान्याचा गाळप हंगाम आवरत आला आहे. बारा साखर कारखाने बंद झाली आहेत. मात्र अजून किती ऊस शिल्लक आहे. कोणत्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक राहील. सुरू असलेल्या साखर कारखान्याचा गाळप हंगाम शेवटाकडे आला आहे.

त्यामुळे ऊस नेण्यासाठी मजुरांकरवी पैसे घेतले जातात, ऊस लवकर जावा तसेच तोडणीला सोपे जावे यासाठी नाइलाजाने ऊस पेटवून दिला जातोय. घातलेल्या उसाची एफआरपी पंधरा दिवसांत देणे बंधनकारक असताना ती दिली जात नसल्याच्या तक्रारी असूनही त्याकडे बिनधास्तपणे दुर्लक्ष करत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT