VNMKV pARBHANI Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Incubation Center : ‘वनामकृवि’तील कॉमन इनक्युबेशन सेंटर करार तत्त्वावर चालविणार

VNMKV Parbhani : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत १ जिल्हा १ उत्पादन (ओडीओपी) अंतर्गत अन्न तंत्र महाविद्यालयामध्ये सामायिक उष्मायन केंद्र (कॉमन इनक्युबेशन सेंटर) उभारण्यात आले आहे.

माणिक रासवे

Parbhani News : आधुनिक पद्धतीने गूळ, गूळ पावडर, गूळ वड्या (क्यूब), ऊस रस, बाटलीबंद पेय, काकवी तसेच मसाले निर्मितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयातील सामायिक उष्मायन केंद्र (कॉमन इनक्युबेशन सेंटर) चालविणे आणि देखभाल (ऑपरेशन अॅन्ड मेन्टेनन्स) करार तत्त्वावर महिला स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सावर्जनिक, खासगी क्षेत्रातील उद्योजकांना देण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न तंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी दिली.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत १ जिल्हा १ उत्पादन (ओडीओपी) अंतर्गत अन्न तंत्र महाविद्यालयामध्ये सामायिक उष्मायन केंद्र (कॉमन इनक्युबेशन सेंटर) उभारण्यात आले आहे.

या केंद्रामध्ये गूळ प्रक्रिया, उसापासून रस बाटलीबंद बेय, काकवी, मसाले निर्मितीसाठी आधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध आहे. शेतकरी, उत्पादक कंपन्या, महिला, स्वंय सहाय्यता गट तसेच नवउद्योजक आदींना प्रात्यक्षिकातून अन्न प्रक्रिया, सुरक्षा व स्वच्छता मानके बाबत प्रशिक्षित केले जाणार आहे.

त्याद्वारे नवउद्योजकता वाढीस पाठबळ मिळणार आहे. गूळ, उसाचा रस, बाटली बंद पेय प्रक्रियेमध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम होतील. या पदार्थांची प्रक्रिया, पॅकेजिंग तथा अन्न तपासणी सुविधेचा उपयोग करता येईल. या उष्मायन केंद्रातील सुविधांचा उपयोग करुन लघू व सूक्ष्म उद्योजकांना त्यांचे अन्न पदार्थ व त्याचा ब्रँड विकसित करणे.

यातील प्रक्रिया साखळीचा उपयोग करुन विकसित अन्न पदार्थ निर्मितीची चाचणी घेऊन त्याची व्यावसायिक तत्त्वावर तरलता तपासता येईल. या केंद्रासाठी ऑपरेशन व देखभाल करार तत्त्वावर निविदा मागविण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या www.vnmkv.ac.in या संकेतस्थळावर अधिक माहिती आहे, असे डॉ. क्षीरसागर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT