Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा ओलांडला आहे. अद्याप सत्तास्थापनेसह मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महायुतीने ठरवलेला नाही. भाजपचे १३२ आमदार असल्याने त्यांचाच आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे बोलले जात आहे. पण याचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. यासाठी राज्यात उद्या (ता.३) भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार आहेत. ज्यात निर्मला सितारामण आणि विजय रुपाणी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. महायुतीला बहुमत मिळाले असून एकट्या भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागांवर विजय मिळवला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या आहेत.
सध्या राज्याच्या मुख्यमंत्री पदासह कोणती खाती आणि किती खाती द्यायची यावरून तिन्ही पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या ३१ व्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाह आणि इतर महत्वाचे भाजप नेते उपस्थित असणार आहेत.
महायुतीतील इतर पक्षांच्या गटनेत्याची निवड झाली असून अद्याप भाजपच्या विधिमंडळ गटनेत्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. उद्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे.
तसेच राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा भाजपचा तो चेहरा कोण यावर देखील पडदा पडण्याची शक्यता आहे. विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी भाजपचे निरीक्षक मुंबईत उद्या येत आहेत. भाजपचे निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण आणि विजय रुपाणी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.