Deepak Kesarkar Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Handicraft Research Center : बांबू हस्तकला संशोधन केंद्र आदर्श रोजगार निर्मिती केंद्र बनेल

Deepak Kesarkar : ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून बांबूवर काम करणाऱ्या कॉनबँक संस्थेच्या माध्यमातून देशातील पहिले हस्तकला संशोधन केंद्र कुडाळ एमआयडीसी येथे उभारले जात असून, हे केंद्र आदर्श रोजगार निर्मिती केंद्र बनेल.’’

Team Agrowon

Sindhudurg News : ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून बांबूवर काम करणाऱ्या कॉनबँक संस्थेच्या माध्यमातून देशातील पहिले हस्तकला संशोधन केंद्र कुडाळ एमआयडीसी येथे उभारले जात असून, हे केंद्र आदर्श रोजगार निर्मिती केंद्र बनेल,’’ असे मत राज्याचे शिक्षणमंत्री आणि सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केले.

देशातील पहिले बांबू हस्तकला संशोधन केंद्र कुडाळ येथील कॉनबॅक संस्थेच्या माध्यमातून उभारले जात असून, त्याकरिता सिंधुरत्न योजनेतून २ कोटी २५ लाखांचा निधी देण्यात आला आहे.

या केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (ता. ७)खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाला. या सोहळ्याला बांबू संशोधन केंद्राचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, महेंद्र केणी, अविनाश रेवंडकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, की कॉनबॅक संस्थेने बांबूवर प्रकिया करून विविध उत्पादनांची दर्जेदार निर्मिती केली आहे. जगभर या संस्थेने विश्वासार्हता निर्माण केली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून हे संशोधन केंद्र उभे राहत आहे.

या संस्थेला कायम सिंधुरत्न योजनेचे आणि शासनाचे सहकार्य राहणार आहे. बांबूपासून आर्थिक क्रांती जिल्ह्यात घडेल, असा विश्वास त्यांनी केला. महिलांना देखील रोजगार उपलब्ध होईल. भारतातील हे पहिले बांबू संशोधन केंद्र असून ते सिंधुदुर्गात उभे राहत असल्याचे श्री. केसरकर यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Survey: खानदेशात वादळग्रस्त नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरूच

Cotton Farming: सघन लागवड तंत्रासह काटेकोर व्यवस्थापन

Kharif Crop Competition 2026: ‘खरीप हंगाम २०२६ पीकस्पर्धेत सहभागी व्हा’

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणावरुन सांगलीच्या नागेवाडी, भाग्यनगरमध्ये तणाव, पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

Loan Waiver Protest: सरसकट कर्जमाफीसाठी चांदूरबाजार येथे आंदोलन

SCROLL FOR NEXT