Ashadhi Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Dnyaneshwar Maharaj Palkhi: माउलींच्या पालखी सोहळ्यातील पुरंदावडेचे रिंगण उत्साहात

Warkari Dindi: माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे गावाने माउलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत गोल रिंगणाने भक्तिभावात केले. टाळ, मृदंग, हरिनाम आणि जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हालेला दिसून आला.

सुदर्शन सुतार

Solapur News:

अश्व धावे अश्वा मागे

वैष्णव उभे रिंगणी,

टाळ मृदंगा संगे

गेले रिंगण रंगूनी ॥

या पंक्तीप्रमाणे वैष्णवांची झालेली दाटी, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या गजरात संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पुरंदावडे (ता. माळशिरस) येथील रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मंगळवारी दुपारच्या न्याहरीनंतर पालखी सोहळा माळशिरस मुक्कामी विसावला.

नातेपुते येथील मुक्कामानंतर माउलींच्या पालखीचे पहिल्या गोल रिंगणासाठी पुरंदावडे येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जयघोषात आगमन झाले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच रिंगणात भाविकांनी गर्दी केली होती. त्यासाठी दुपारी अश्व पुरंदावडे येथील रिंगणात दाखल झाला. त्याचबरोबर रथापुढील दिंड्याही दाखल झाल्या.

या दिंडीमध्ये पुरुष व महिला वारकरी सहभागी झाले होते. ज्ञानोबा- तुकारामांचा जयघोष करीत दिंडीने उपस्थित लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. मंगळवारी दुपारी १२.३५ मिनिटांनी माउलींचा रथसोहळा पुरुंदावडे येथील रिंगण ठिकाणी पोहोचला. पालखीने एक फेरी मारली व पालखी मध्यभागी ठेवण्यात आली.

या वेळी पालखीची पूजा अर्जुनसिंह मोहिते पाटील, सरपंच राणी मोहिते, उपसरपंच देविदास ढोपे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावनधारक महिला, झेंडेकरी या़ंच्यासह अश्वाच्या फेऱ्यासह गोल रिंगण झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT