Gram Panchayat Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींचा लवकरच वाजणार बिगुल

Local Body Election : विधानसभा निवडणुकीपाठोपाठ जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या या ग्रामपंचायतीसाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

Team Agrowon

Nashik News : विधानसभा निवडणुकीपाठोपाठ जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या या ग्रामपंचायतीसाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

यात इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक ६५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.त्यानुसार इच्छुकांची मोर्चे बांधणी व तयारी सुरू झाले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे.

सध्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत अद्याप हालचाली सुरू झालेल्या नाहीत. मात्र तत्पूर्वी, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार आहे. त्यामध्ये लवकरच जिल्ह्यात १८१ ग्रामपंचायतींची निवडणूक लवकरच घेण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभेनंतर आता ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचा आखाडा रंगणार असल्याचे पाहायला मिळेल.

जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक ६५ ग्रामपंचायती निवडणूक होईल. राज्यात भारतीय जनता पक्ष महायुतीचे सरकार विराजमान झाल्याने आता थेट सरपंच निवडण्याचा निर्णय कायम राहील. जनतेतूनच सरपंच निवडला जाणार असल्याने त्यादृष्टीने इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

आमदार आता त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. दरम्यान,या ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला असला, तरी निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही.

तालुकानिहाय ग्रामपंचायती

तालुका ग्रामपंचायती

नाशिक ७

कळवण १४

त्र्यंबकेश्‍वर १७

बागलाण १७

निफाड ३२

इगतपुरी ६५

मालेगाव ९

येवला ८,

नांदगाव ८

दिंडोरी १

चांदवड १

पेठ १

देवळा १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT