Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Awards : कृषी पुरस्कारांना अखेर मुहूर्त

Agriculture Department : कृषी विभागातर्फे देण्यात येणारे मागील तीन वर्षांपासूनचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार २९ सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहेत.

Team Agrowon

Pune News : कृषी विभागातर्फे देण्यात येणारे मागील तीन वर्षांपासूनचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार २९ सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहेत. कृषी पुरस्कारांच्या रकमेत तिप्पट वाढ केल्यानंतर होणारा हा पहिलाच कृषी पुरस्कार वितरण सोहळा आहे.

कृषी पुरस्कारांची रक्कम याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून मुंबईत प्रातिनिधिक स्वरूपात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत.

वित्त विभागाने मागील आठवड्यात या पुरस्कार सोहळ्यासाठी आवश्यक ९ कोटींच्या फाइलला मान्यता दिल्यानंतर बुधवारी (ता. १८) कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निमंत्रण दिले. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत.

राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (आदिवासी), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न आणि उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार असे २०९ पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतात.

गेल्या दोन वर्षांचे पुरस्कार जाहीर झाले. मात्र त्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. याआधी कृषिरत्न पुरस्कारासाठी ७५ हजार, कृषिभूषणसाठी प्रत्येकी ५० हजार, शेतीमित्र आणि युवा शेतकरी पुरस्कारासाठी प्रत्येकी ३० हजार, शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी प्रत्येकी ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येत होते.

मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या काळात झालेल्या कृषी पुरस्कार सोहळ्यात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी या पुरस्कारांची रक्कम तिप्पट करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणारे पुरस्कार हे तिप्पट रकमेचे असतील.

वित्त विभागाने घेतले आक्षेप

कृषी पुरस्कार सोहळ्यातील काही घटकांवर वित्त व नियोजन विभागाने आक्षेप घेतले होते. वाढत्या महागाईच्या काळात प्रवास आणि इतर भत्त्यांत वाढ करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र त्याला मंजुरी देता येणार नसल्याचा पवित्रा वित्त व नियोजन विभागाने घेतला होता. या बाबतचे वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यावर कृषी क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर वित्त व नियोजन विभागाने या फाइलला मंजुरी दिल्याने पुरस्कार वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

वरळीच्या ‘एनएससीआय’मध्ये कार्यक्रम

कृषी पुरस्कार वितरण सोहळा वरळीच्या ‘एनएससीआय’मध्ये होणार असून यासाठी मोठी तयारी कृषी विभागाने केली आहे. या सोहळ्यासाठी एक इव्हेंट कंपनी निश्‍चित करण्यात आल्याचे समजते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT