Agricultural Engineers Society Session Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Engineers Society Session : कृषी अभियंता सोसायटीचे ५८ वे अधिवेशन आजपासून परभणीत

Annual Convention : भारतीय कृषी अभियंता सोसायटी (इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स) ५८ वे वार्षिक अधिवेशन आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये मंगळवार (ता. १२) ते गुरुवार (ता. १४) या कालावधीत भारतीय कृषी अभियंता सोसायटी (इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स) ५८ वे वार्षिक अधिवेशन आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहामध्ये मंगळवारी (ता. १२) सकाळी १० वाजता या अधिवेशनाचे उद्‌घाटन होणार आहे.

‘पुढच्या पिढीतील डिजिटल शेतीसाठी अभियांत्रिकीतील नवकल्पना’ या विषयावरील या अधिवेशनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा हे राहतील. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे,

अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महिंद्रा कृषी अवजारे आणि टॅक्टर्सचे अध्यक्ष हेमंत सिक्का, टाफे ग्रुपचे अध्यक्ष डॉ. टी. आर. केशवन, महिकोचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले, इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लि.चे उपाध्यक्ष कुमार बिमल, इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्सचे माजी अध्यक्ष प्रा. गजेंद्र सिंह, डॉ. नवाब अली,

डॉ. व्ही. एम. मायंदे, माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, डॉ. एन. एस. राठोड, डॉ. ए. एस. धवन, इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्सचे अध्यक्ष डॉ. एस. एन. झा, महाचिव डॉ. पी. के. साहू, निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, आयोजन सचिव डॉ. हरिश आवारी उपस्थित राहणार आहेत.

गुरुवारी (ता. १४) पुढच्या पिढीतील डिजिटल शेतीसाठी अभियांत्रिकीतील नवकल्पना या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात कृषी यांत्रिकीकरण व स्वयंचलन, अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, जमीन आणि जल व्यवस्थापन तंत्रज्ञान, हरित आणि पर्यायी ऊर्जा तंत्रज्ञान या विषयावर विचार मंथन होणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संघटना उद्योगांचे प्रतिष्ठित प्रतिनिधी, धोरणकर्ते, विकास विभागातील मान्यवर, विदेशातील शास्त्रज्ञ तसेच विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत.

मराठवाड्यातील शेतीच्या संधीवर विलास शिंदे करणार मार्गदर्शन

या अधिवेशनात मंगळवारी ‘कृषी परिवर्तनासाठी इच्छुक तरुणांसाठी कृषी अभियांत्रिकी शिक्षण’ या विषयी तर बुधवारी (ता. १३) दुपारी अडीच वाजता मराठवाड्यातील शेती संधी व आव्हाने या विषयावर नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Meal Export Subsidy : सोया पेंड निर्यात अनुदानातून सोयाबीनला मिळेल का ‘बूस्ट’?

Sugarcane Crushing Season : राज्य सरकार नमले; गाळप हंगामाला मान्यता

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

SCROLL FOR NEXT