Dairy Society Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Society Issue : भंडाऱ्यातील २४९ दूध संस्था संकटात

Cooperative Dairy Union : खासगी दूध संघाचा वाढता विस्तार, वेळीच होणारे चुकारे, मिळणारा वाढीव दर यामुळे जिल्ह्यातील सहकारी दूध संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Team Agrowon

Bhandara News : खासगी दूध संघाचा वाढता विस्तार, वेळीच होणारे चुकारे, मिळणारा वाढीव दर यामुळे जिल्ह्यातील सहकारी दूध संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच्याच परिणामी जिल्ह्यातील तब्बल २४९ दूध संस्था अवसायनात निघत त्यांच्यावर अवसायक नेमण्याची वेळ आली आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. धान पिकाच्या जोडीला या भागातील शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. त्या माध्यमातून संकलित होणारे दूध या भागातील सहकारी दूध संघाना दिले जात होते. याच माध्यमातून जिल्हाभरात सहकाराचे जाळे विणल्या गेले होते.

प्रतिदिन लाखो लिटर दुधाचे संकलन या संस्थांद्वारे होत होते. संस्था देखील शेतकरी हित साधण्यासाठी पुढाकार घेत होत्या. मात्र त्यानंतरच्या काळात जिल्हयात खासगी दूध संस्थांनी संकलनास सुरुवात केली. शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्याद्वारे सुरुवातीला वाढीव दर देण्यात आला.

त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी कंपन्यांच्या संकलन केंद्रावर दुधाचा रतीब घालण्यास सुरुवात केली. याचा फटका जिल्ह्यातील सहकारी दूध संघाना बसला. त्यांच्याकडील दुधाची आवक कमी होत गेली. त्यानंतरच्या काळात संस्था आर्थिक अडचणीत आल्या.

शेतकऱ्यांकडून खासगी कंपन्यांना अधिक दूध

मार्च २०२४ ची आकडेवारी पाहता एकूण २ लाख ७० हजार २१५ लिटर दूध संकलन करण्यात आले. यामध्ये खासगी संस्थांचे दूध संकलन २ लाख २३ हजार ६८७ तर भंडारा जिल्हा दूध संघाचे अवघे ४६ हजार ५२४ लिटर इतके अत्यल्प होते. त्यावरुनच शेतकऱ्यांद्वारे आता खासगी कंपन्यांनाच अधिक दूध दिले जात असल्याचे सिद्ध होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT