Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाला ठाकरे गटाचा खुला पाठिंबा!

Thackeray Group Support : नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेच्या ठाकरे गटाने विधानसभेत पाठिंबा जाहीर केला. मात्र, छगन भुजबळ यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: नागपूर ते गोवादरम्यान प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठिंबा दिला असून, या प्रस्तावित मार्गाला समर्थन देत असल्याचे विधानसभेत बुधवारी (ता. ५) जाहीर केले.

ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी शिफारस केलेल्या भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दिले. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी ८६ हजार कोटी रुपये खर्च करणार, त्याच वेळी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पैसे नाहीत, त्याकडेही पाहिले पाहिजे, अशी मागणी केली.

भास्कर जाधव म्हणाले, की सरकारने नागपूर ते गोवा मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मी समर्थन देत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी ग्रीनफिल्ड महामार्ग कोकणातून करण्याची घोषणा केली होती. त्याला सरकारने प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.

राज्यपालांच्या अभिभाषणात नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती मार्गाचे बांधकाम सरकारने हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना विश्‍वासात घेऊन हा द्रुतगती मार्ग पूर्ण करण्यात येईल. या द्रुतगती मार्गामुळे, त्या मार्गावरील प्रमुख धार्मिक क्षेत्रे व तीर्थस्थळे जोडण्यात येतील. या द्रुतगती मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर या प्रदेशातील आर्थिक विकासाला देखील चालना मिळेल. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ८६ हजार ३०० कोटी रुपये इतका असल्याचा उल्लेख होता. या भाषणाचे जाधव यांनी समर्थन करत ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली.

शक्तिपीठ करता, पण ग्रामीण रस्त्यांचे काय? : भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले, की राज्यात शक्तिपीठ महामार्गासाठी ८३ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच सात हजार ४८० कोटींचे सिमेंट-काँक्रीटचे रस्ते केले जाणार आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागांतील रस्त्यांच्या कामांचे पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन केले. आपण मोठे रस्ते करणार आणि ग्रामीण भागाकडे पाहणार नाही. आमदारांना निधी मिळाला नाही तर मतदारसंघात काय तोंड दाखवणार?

‘इथेनॉलबाबत धरसोडपणा नको’

भुजबळ म्हणाले, की इथेनॉलबाबत धरसोडपणा करू नये. आधी इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले आणि नंतर साखर निर्मिती कमी झाल्याने त्यावर बंदी घातली. हा धरसोडपणा साखर उद्योगासाठी चांगला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT