Soybean Quality agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Quality : सोयाबीनची उगवण क्षमता तपासा, कृषी विभागाचे आवाहन

७० टक्के उगवण क्षमता आली तर बियाणे उत्तम असल्याचे समजून पेरणी करण्यास हरकत नसल्याचे प्रबोधन कृषी विभागाकडून केले.

sandeep Shirguppe

Kolhapur Soybean : कोल्हापुरातील मजले येथे कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, तळसंदेतर्फे शेतकरी मेळावा व सोयाबीन उगवण क्षमता चाचणी प्रयोग राबविण्यात आला. घरचे सोयाबीन बियाणे वापरताना उगवण क्षमता तपासून त्याचा वापर करावा. ७० टक्के उगवण क्षमता आली तर बियाणे उत्तम असल्याचे समजून पेरणी करण्यास हरकत नसल्याचे प्रबोधन कृषी विभागाकडून केले.

कृषी विज्ञान केंद्र, तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंतराव जगताप, दीपक पाटील, डॉ. एन. एस. वाघ, दीपाली मस्के यांनी सोयाबीन, भुईमूग, भात या पिकांबाबत मेळाव्यात मार्गदर्शन केले.

मजलेचे कृषी सहायक क्रांती गुरव यांनी सोयाबीन उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक दाखविले. मंडल कृषी अधिकारी नंदकुमार मिसाळ, कृषी पर्यवेक्षक बी. एम. गोडगे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी अनुदानावर आधारित सोयाबीन वाटप सुरू आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी उन्नती योजनेतंर्गत अन्न व पोषण सुरक्षा ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमातून तालुक्यासाठी ४५० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध झाली आहेत. त्यात सर्वसाधारण गटासाठी २३४ क्विंटल, अनुसूचित जातीसाठी १३९.५० क्विंटल, अनुसूचित जमातीसाठी ७६.५० क्विंटल बियाणांचे वाटप होणार आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हे वाण विकसित केले आहे. भारी जमीन व चांगले व्यवस्थापन केल्यास अधिक उत्पादन देते. सरासरी उत्पादन हेक्टरी २० ते २५ क्विंटल आहे. शेतकऱ्याने एक एकराचे प्रात्यक्षिक घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ३० किलो बियाणे वाटप केले जाणार आहे.

बियाणांचा दर ८० रुपये असून, त्याला २० रुपयांचे अनुदान आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी सातबारा, आठ-अ उतारा, आधार कार्डची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक घेऊन संबंधित कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Anand Nadkarni : मनाला दिलासा देणारा आवाज हरपला; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुःखद निधन

Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार

Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य

Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT