Tendu Leaf Agrowon
ॲग्रो विशेष

Tendu Leaf : मजुरांचा सुरक्षेशिवाय जंगलात तेंदूपत्ता संकलन

Forest Department : विदर्भात यवतमाळसह गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती व मराठवाड्यातील नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी मे महिन्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होते.

Team Agrowon

Yavatmal News : राज्यात मे महिन्यात सध्या तेंदूपत्ता संकलनाचा सिझन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी लाखो मजूर जिवाची पर्वा न करता भल्या पहाटे जंगलात जाऊन तेंदूपत्ता गोळा करण्याचे काम वन विभागाच्या अखत्यारित करतात. परंतु या मजुरांना शासनाकडून कोणतीही सुरक्षितता दिली जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे. अलीकडे या मजुरांवर वन्यप्राण्यांचे हल्लेसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

विदर्भात यवतमाळसह गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती व मराठवाड्यातील नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी मे महिन्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होते. या कामावर बहुतांश आदिवासी व दलित मजूरवर्ग पहाटेपासून राबतो. परंतु मजुरीशिवाय यांच्या हातात काहीच पडत नाही.

केवळ वीस दिवस किंवा फारफार तर महिनाभर हे काम चालते, त्यानंतर मात्र दुसरे काम पाहावे लागते. अतिशय धोकादायक असलेल्या या कामात कोणतीही सुरक्षितता महाराष्ट्रात या मजुरांना नाही.

कोणताही विमा शासनाकडून त्यांचा काढला जात नाही. त्या तुलनेत मध्य प्रदेश, झारखंड, तेलंगणात तेंदूपत्ता मजुरांचे फेडरेशन स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत मजुरांच्या सर्व हक्कांचे पालन योग्यरीत्या केले जाते.

महाराष्ट्रात मात्र वन विभागाकडेच्या देखरेखीखाली तेंदूपत्ता संकलन केले जाते. बोनस दिला जात असला तरी त्यातून प्रशासकीय खर्च मोठ्या प्रमाणात केल्याचे दाखविण्यात येऊन प्रत्यक्षात मजुरांच्या हाती काहीच पडत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT