Sericulture  Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : सांगलीतील शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल

Silk Farming : यंदाच्या वर्षात आक्टोबरअखेर २०९ शेतकऱ्यांना १ लाख अंडीपुंजांचे वाटप केले असून ६० टन कोषाचे उत्पादन घेतले आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्हा रेशीम विकासामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे प्रोत्साहित केले जात आहे. यंदाच्या वर्षात आक्टोबरअखेर २०९ शेतकऱ्यांना १ लाख अंडीपुंजांचे वाटप केले असून ६० टन कोषाचे उत्पादन घेतले आहे. मार्चअखेर कोषांचे उत्पादन वाढेल असा अंदाज रेशीम विकास कार्यालयातील सूंत्रांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा रेशीम विकास कार्यालयामार्फत तुती लागवडीला चालना मिळावी, यासाठी महारेशीम अभियानासह विविध अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल रेशीम शेतीकडे वाढला असल्याचे चित्र आहे.

चालु वर्षात ऑक्टोबरअखेर २३३ एकरावर २०९ शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली. या शेतकऱ्यांना १ लाख अंडीपुंजांचे वाटप करण्यात आले होते. २०९ शेतकऱ्यांनी ६० टन कोषांचे उत्पादन घेतले आहे. या वर्षी कोषाचे दरही चांगले असल्याचे चित्र आहे. कोषाला प्रतिकिलो सरासरी ५५० रुपये असा दर मिळत आहे.

शासनाच्या प्रोस्ताहनामुळे तसेच सिल्क समग्र, महारेशीम अभियान या विविध योजनांच्या माध्यमातून अनुदानही शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकरी तुती लागवडीसाठी पुढे येत आहेत. जत, मिरज, वाळवा, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यांतील शेतकरी तुतीची लागवड करत आहेत.

गतवर्षी म्हणजे २०२३-२४ या वर्षात २५१ शेतकऱ्यांनी २६२ एकरावर तुतीची लागवड केली होती. १ लाख ६१ हजार १५० अंडीपूंज शेतकऱ्यांना दिले होते. त्यातून १०९ टन कोषांचे उत्पादन घेतले आहे. दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी शेतीपूरक म्हणून रेशीम शेतीकडे वळला आहे.

त्यामुळे कोषाचे उत्पादनही वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी १०९ टन कोषांचे उत्पादन घेतले होते. यंदा शेतकऱ्यांनी ऑक्टोबरअखेर ६० टन कोषांचे उत्पादन घेतले असून मार्चअखेर १ लाख टन अंडीपूंज देण्याचे नियोजन अजून ६० टनांहून अधिक कोषांचे उत्पादन होईल, असा अंदाज रेशीम विकास कार्यालयाने व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT