Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Water Scarcity : यंदा बारामती जिरायती भागात कमी पर्जन्यमान झाल्याने या भागात यंदा फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Baramati News : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेल्या शिरसाई उपसासिंचन योजनेतून टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर लाभार्थी गावातील पिण्याचे पाण्याचे स्रोत बळकट करणारे पाझर तलाव आणि नाले पाणी सोडून भरण्यात आले आहेत. रविवारी सकाळी आवर्तन संपल्याने योजना बंद करण्यात आली आहे.

यंदा बारामती जिरायती भागात कमी पर्जन्यमान झाल्याने या भागात यंदा फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर शिरसाई उपसायोजना १७ एप्रिलला कार्यान्वित करून शिरसाईच्या लाभक्षेत्रातील गावात ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहीर किंवा पिण्याच्या पाण्याचा स्रोत अवलंबून असलेल्या पाझर तलाव, नाले तसेच ओढ्याला प्राधान्य क्रम देवून शिरसाई योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे संबंधित विहिरी आणि कूपनलिकांना पाणी फुटणार असून यामुळे पिण्याच्या पाण्यासह काही प्रमाणात जनावरांचा चारा पिकांना देखील फायदा होणार आहे. खडकवासला कालव्याद्वारे शिरसाई उपसायोजनेला उपसा करण्यासाठी ८० दशलक्ष घनफूट (उन्हाळी आवर्तन) पाणी देण्यात आले. त्यानुसार उपसा विभाग आणि संबंधित पाणी वापर संस्था तसेच तालुका प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते.

त्यानुसार शिरसाई योजनेच्या डावा व उजव्या कालव्यातून सलग दहा दिवसात आवर्तन पूर्ण करण्यात आले आहे. रविवारी (ता. २८) योजनेचे पंप बंद करण्यात आले आहेत. अशी माहिती उपसा सिंचन योजनेचे कनिष्ठ अभियंता अमोल शिंदे व शाखा अभियंता नारायण गदादे यांनी दिली.

याबाबत तुकाईमाता पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष मधुकर भोसले म्हणाले, यावेळी शिरसाईच्या लाभक्षेत्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे कमी पाण्यात आवर्तन पूर्ण करणे म्हणजे तारेवरील कसरत होती. हे आवर्तन खूप अवघड होते. मात्र याकामी खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्या श्वेता कुऱ्हाडे यांच्यासह तालुका प्रशासनाने विशेष लक्ष घालून योग्यरीत्या काम केल्यामुळे हे आवर्तन पूर्ण करणे शक्य झाले आहे.

शिरसाईचे आवर्तन दिलेली गावे

जराडवाडी, उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, बऱ्हाणपूर, शिर्सुफळ, साबळेवाडी, गाडीखेल, उंडवडी कप, गोजुबावी, भोळोबाचीवाडी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT