Tembhu Water Rabi Season agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Water Rabi Season : रब्बी हंगामासाठी ‘टेंभू’चे आवर्तन सुरू, ३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

Rabi Season : मुख्य कालव्यातून हिंगणगाव बुद्रुक तलावात व पुढे खानापूर आटपाडी आणि सांगोल्यापर्यंत सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Tembhu Irrigation Scheme : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या टेंभू सिंचन योजनेचे रब्बी हंगामासाठी आवर्तन बुधवार (ता.०८) सुरू झाले आहे. सांगली, सातारा जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यांतील सांगोला तालुक्याच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 'टेंभू’च्या मुख्य कालव्याद्वारे योजनेचे पाणी लवकरच शिवाजीनगर तलावात पोहोचणार आहे. त्यापुढे मुख्य कालव्यातून हिंगणगाव बुद्रुक तलावात व पुढे खानापूर आटपाडी आणि सांगोल्यापर्यंत सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील ५५ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकरी व पिकांनाही दिलासा मिळाला आहे.

लांबणीवर पडलेल्या आवर्तनामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी नुकसान होऊ लागले होते. रब्बी पिके कोमेजून जात होती. ऊस व बागायती पिकांसमोरील पाणी संकट वाढले होते. ‘टेंभू’च्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, 'योजनेचा टप्पा क्रमांक १ अ मधून कृष्णा नदीचे पाणी सोडले गेले. ते टप्पा क्रमांक १ ब मध्ये पोहोचवून खड्या उंचीवरून (६१ मीटर) पाणी उचलून वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी १ हजार ९५० अश्वशक्तीचे ३३ पंप बसवले गेले आहेत. त्यानंतर, हे पाणी ८५ मीटर उचलून ६ नळपाणीद्वारे खांबाळे बोगद्याच्या सुरवातीस पोहोचवले आहे.

खंबाळे औंध बोगद्याच्या माध्यमातून मुख्य कालव्यात प्रवेश करत, पाणी कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर तलावात सोडण्यात येत आहे. पाण्याचा वितरण कार्यक्रम वेगाने सुरू असून सुर्ली व कामथी कालव्यात पाणी लवकरच जाणार आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT