Takari Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation : ‘ताकारी’चे पाणी पोहोचले तासगाव तालुक्यात ; ताकारीचे पंधरा पंप सुरू ः पाटबंधारे विभागाची माहिती

Takari Irrigation Project : यावर्षी पावसाने ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रावर कृपादृष्टी ठेवल्याने सुमारे दोन महिने पाणी उशिरा सुरू केले आहे.

Team Agrowon

Sangali News : सांगली ः यावर्षी पावसाने ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रावर कृपादृष्टी ठेवल्याने सुमारे दोन महिने पाणी उशिरा सुरू केले आहे. डिसेंबरच्या मध्यापासून रब्बी हंगामासाठी ताकारीचे आवर्तन सुरू केले आहे. योजनेचे पंधरा पंप सुरू आहेत.

योजनेचे  पाणी उचलून लाभ क्षेत्राला दिले जात असून ताकारी योजनेचे पाणी सध्या तासगाव तालुक्यातील पानमळेवाडी पोहोचले आहे. काही दिवसांतच हे पाणी शेवटच्या १४४ किलोमीटरपर्यंत सोनी-भोसे (ता. मिरज) येथे पोहोचेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

यावर्षी कोयना धरणातही भरपूर पाणीसाठा असल्याने कालवा समितीच्या बैठकीत उपसा योजनांसाठीच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ताकारी योजनेतून रब्बीचे पाणी सुरू झाले आहे. योजनेचे पाणी तासगाव तालुक्यातील मुख्य कालव्याच्या ८७ किलोमीटरवर पानमळेवाडीजवळून वाहत आहे.

हे पाणी मागणीनुसार मुख्य कालव्याच्या शेवटी किलोमीटर १४४ वर सोनी (भोसे) या मिरज तालुक्यातील गावापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले आहे.

‘ताकारी’च्या या पाण्याचा उपयोग बारमाही पिकांसह रब्बी शेतीला होत आहे. दरम्यान, लांब पल्ल्यावर गेल्यावर मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब भरपूर राहावा, यासाठी टप्पा १ आणि २ वरील प्रत्येकी ११ पंप सुरू करण्यात आले आहेत. शिवाय टप्पा ३ व व टप्पा ४ वरील प्रत्येकी २ पंप सुरू ठेवून पाणी सोनहिरा खोऱ्यात सोडण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT