Marathwada Agriculture agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Agriculture : मराठवाड्यासाठी १८ हजार २२७ कोटी कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट

Objective Credit Supply Marathwada : दरवर्षीच्या तुलनेत उद्दिष्टात वाढ केली नसती तरी अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळणे बाकी असताना मिळालेल्या कर्ज पुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती करणे बँकांसमोर आव्हान असणार आहे.

Team Agrowon

Kharip Season : यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी सुमारे १८ हजार २२७ कोटी ९९ लाख कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरवर्षीच्या तुलनेत उद्दिष्टात वाढ केली नसती तरी अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळणे बाकी असताना मिळालेल्या कर्ज पुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती करणे बँकांसमोर आव्हान असणार आहे.

कर्ज माफीचा कायम असलेला गुंता, मोठ्या प्रमाणात थकित असलेले कर्ज, सीबिल विषयाचा संभ्रम, मोठ्या प्रमाणात कर्ज प्रकरणात होत असलेल्या वन टाइम सेटलमेंट, राजकीय हस्तक्षेप यासह इतर अनेक अडचणी यंदाच्या कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्टपूर्तीमध्ये असतील असे सूत्रांचे म्हणणे आहे. सुमारे १७ लाख ९५ हजार ७०८ खातेदारांना कर्ज पुरवठा होणे अपेक्षित आहे.

त्यामध्ये माहितीनुसार लातूरमध्ये ३ लाख १६ हजार ८०५ खातेदारांना नांदेडमध्ये २ लाख ८६ हजार २२४, बीडमध्ये २ लाख ३ हजार ४३५, छत्रपती संभाजीनगरमध्ये २ लाख ३० हजार १२, धाराशिवमधील १ लाख ६४ हजार ६७३, परभणीमधील २ लाख ३५ हजार ९५८, जालनामधील १ लाख ६३ हजार ३२ तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ५६९ खातेदारांना कर्ज पुरवठा होणे अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय उद्दिष्ट (कोटीत)

लातूर ३०९९.९८

नांदेड २५३२.९८

बीड २४०९.९८

छ.संभाजीनगर २४००

धाराशिव २२८०.०५

परभणी २२६०

जालना १८२०.०१

हिंगोली १४२४.९९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT