Jalgaon Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Water Shortage : जळगाव जिल्ह्यात अठरा गावांत टँकर

Water Issue : जळगाव जिल्ह्यातील तापमान ४७ अंशांवर पोहोचले होते. दोन दिवसांपासून त्यात घट होऊन ४३ अंशांपर्यंत आले आहे.

Team Agrowon

Water Problem Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील तापमान ४७ अंशांवर पोहोचले होते. दोन दिवसांपासून त्यात घट होऊन ४३ अंशांपर्यंत आले आहे. अतितापमानामुळे आतापर्यंत सहा जणांचा उष्माघातसदृश तापाने मृत्यू झाला आहे.

‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात वाढ होत असून, जमिनीतील पाणीपातळी खालावत आहे. सिंचन प्रकल्पातील जलसाठाही कमी होत आहे. आणखी ४ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. पूर्वी १४ गावांमध्ये १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता १८ गावांत २० टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

वाघूर धरण वगळता इतर धरणांतील साठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई जाणवेल. जिल्हाभरात उष्णतेची लाट जाणवत आहे. वाढत्या उन्हासोबत पाणीटंचाईचेही संकट जिल्हावासीयांवर ठाकले आहे.

यंदा एक महिना उशिराने पावसाळा होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.

जामनेर तालुक्यातील मोरगाव, रोटवद, किन्ही, नेरी दिगर येथे चार टँकर, भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, वसंतवाडी दोन टँकर, बोदवड तालुक्यातील एनगाव एक टँकर, पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा, खेडीढोक येथे दोन टँकर, चाळीसगाव तालुक्यातील मौजे पिंपळगाव, विसापूर, रोहिणी, अंधारी, हातगाव येथे ६ टँकर, भुसावळ तालुक्यातील कंडारी, कुऱ्हे प्र.न. दोन टँकर, पाचोरा तालुक्यातील रामेश्‍वर आणि लोहारा येथे तीन टँकर, अशा एकूण १८ गावांत २० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

धरणातील साठा असा...

धरणाचे नाव - टक्के पाणी

हतनूर- ५३.३३

गिरणा - २४.३०

वाघूर - ६६.२९

मन्याड - १३.८३

भोकरबारी - १.९०

सुकी - ६३.२३

अभोरा - ६२.६६

अग्नावती- २.९४

तोंडापूर - ४०.१७

हिवरा - १०.२९

मंगरूळ - ४६.५१

बहुळा - २३.३९

मोर - ६६.१६

अंजनी - २३.७३

गूळ - ६६.१२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT