Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : भावनिक होण्यापेक्षा महागाईवर बोला

Inflation : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (ता.१९) सोलापुरात भावुक झाले होते म्हणे, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्‍न आहे.

Team Agrowon

Solapur News : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (ता.१९) सोलापुरात भावुक झाले होते म्हणे, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्‍न आहे. अशा पद्धतीने भावनिक होणे म्हणजे लोकांना मूळ मुद्यांकडून दुसरीकडे भरकटवण्यासारखे आहे, हे काही योग्य नाही. त्यापेक्षा ते बेरोजगारी, महागाईवर बोलले असते, तर अधिक योग्य झाले असते,’’ अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी (ता. २०) येथे पत्रकारांशी बोलताना पंतप्रधानांवर टीका केली.

माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी श्री. पवार सोलापुरात आले होते. त्या वेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, ‘‘सोलापुरातील गृहप्रकल्पाचे श्रेय मोदींनी किंवा भाजपने घेण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकल्पाचे श्रेय माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांना आहे, ते आजचे नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून त्यासाठी ते काम करत आहेत.

विडी कामगारांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे, यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यांच्या मेहनतीचा हा प्रकल्प आहे. आडम मास्तरांचे काम विधायक आहे. विधायक काम करणारे आडम मास्तर यांच्याविषयी पंतप्रधान चार शब्द चांगले बोलले असते, त्यांना प्रोत्साहित केले असते, तर ते शोभून दिसले असते.

प्रत्येक ठिकाणी डावी आणि उजवी विचारसरणी करत बसले, तर विधायक काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका बघायला मिळणार नाही. ही गोष्ट चांगली झाली नाही,’’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.

‘विरोधकांवर दहशतीसाठी ईडीचा वापर’

आमदार रोहित पवारांना ईडीची नोटीस आली आहे, या मुद्द्यांकडे लक्ष वेधले असता शरद पवार म्हणाले, ‘‘ईडीची भीती विरोधकांना दाखवली जाते आहे. अनिल देशमुख यांना सहा महिने तुरुंगात पाठवले. सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले. हे सरकार ईडीचा वापर हत्यार म्हणून करीत आहे. केवळ विरोधकांवर दहशतीसाठीचे हे प्रकार सुरू आहेत,’’ असेही पवार म्हणाले.

‘अजित पवारांच्या भाषणाकडे लक्ष देऊ नका’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील सहकारी बँकेच्या कार्यक्रमात नुकतेच शरद पवारांचे नाव न घेता टीका केली होती. ‘‘वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाहीत,’’ यावर विचारले असता, पवार म्हणाले, ‘‘अजित पवार हे त्याकाळी तरुणच होते, मग त्यांना संधी कुणी दिली. त्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही,’’ असे म्हणत अधिक बोलणे टाळले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT