Talathi Suspend Agrowon
ॲग्रो विशेष

Talathi Suspended : ‘लाडकी बहीण’ दाखल्यासाठी ३० रुपये मागणारा तलाठी निलंबित

Demand money for certificates : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी व कामकाजातील त्रुटींमुळे उमरी (ता. बाळापूर) येथील तलाठी राजेश शेळके यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

Team Agrowon

Akola News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी व कामकाजातील त्रुटींमुळे उमरी (ता. बाळापूर) येथील तलाठी राजेश शेळके यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी हा आदेश जारी केला.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी महिलांकडून मोठी उमरी येथील तलाठी पैसे घेत असल्याचा प्रकार समोर आला होता. यासंबंधी तलाठ्याला तत्काळ नोटीस बजावण्यात आली. मात्र त्यांनी अद्याप खुलासा सादर केला नाही. त्यांच्या दफ्तराची तपासणी करण्यात आली, तसेच सज्जाच्या ठिकाणी ८ नागरिकांचा जबाबही घेण्यात आला. तलाठ्यांनी उत्पन्न दाखल्यासाठी ३० रुपयांची मागणी केली, असा जबाब नागरिकांनी दिला.

दफ्तर तपासणीत गाव नमुना एकच्या नोंदी, गाव नमुना पाचसोबत न जुळणे, नमुना एक अ एक ई पर्यंत अद्ययावत नसणे, गाव नमुना २ ई-चावडीत अद्ययावत नसणे, फेरफार प्रलंबित असणे, त्यात विसंगती आढळणे, ई-चावडीमधील नमुना ६ ड निरंक असणे, नमुना १५ मध्ये नोंदी नसणे, दफ्तरात दैनंदिनी,

शासकीय कामात हलगर्जीपणा, सचोटी न राखणे व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार तलाठी राजेश शेळके यांना निलंबित करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT