Agriculture Implements Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Implements Scam : ‘कृषी अवजारे पुरवठा’ घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा

Agriculture Update : समाजकल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना पुरविण्यात आलेल्या कृषी अवजार संचात मोठा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक स्तरावरील चौकशीत समोर आले होते. परंतु त्यानंतर चौकशीच थंडबस्त्यात टाकण्यात आली.

Team Agrowon

Nagpur News : समाजकल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना पुरविण्यात आलेल्या कृषी अवजार संचात मोठा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक स्तरावरील चौकशीत समोर आले होते. परंतु त्यानंतर चौकशीच थंडबस्त्यात टाकण्यात आली. विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन समता सैनिक दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

समाजकल्याण विभागामार्फत २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचत गटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखली. यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून ८ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला होता. प्रत्येक महिला बचत गटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते. परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. पुरवठादाराने साहित्यच दिले नाही.

याबाबतची तक्रार महिला बचत गटाने विभागीय आयुक्त, समाजकल्याण विभागाकडे केली. हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले. १० टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली. समाज कल्याण विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आल्याची माहिती समोर आली. पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले.

परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परत नेले. १० टक्के रक्कम त्रयस्थ व्यक्तीकडून भरण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली. काही महिला बचत गटांचे प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे समोर आले. काही प्रमाणपत्रांवर एक-दोन वर्षांपूर्वीची तारीख होती. त्यामुळे बचत गट बोगस तयार करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दोन ते तीन तालुक्यांच्या चौकशीतच ही बाब समोर आली. सर्व जिल्हाभर हा प्रकार झाल्याचा अंदाज आहे. अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी हे प्रकरण थंड बस्त्‍यात टाकण्यात आल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन समता सैनिक दलाचे अनिकेत कुत्तरमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

वर्षनिहाय झालेले कर्जाचे वितरण

वर्ष घेतलेले कर्ज (रु.)

२०१९-२० ५९.९४ कोटी

२०२०-२१ ८२.०६ कोटी

२०२१-२२ १२१.५० कोटी

२०२२-२३ १९१.५० कोटी

२०२३-२४ ४२३.७६कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT