Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Dr. Tanaji Sawant : ‘सीबिल’वरून कर्जासाठी अडवणूक करणाऱ्या बँकांवर कारवाई करा

Farmer CIBIL : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बोगस बी-बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री करताना आढळून आल्यास कृषी केंद्रचालकांवर तसेच सीबिल स्कोअर तपासून पीककर्जासाठी अडवणूक करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करावेत

Team Agrowon

Parbhani News : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बोगस बी-बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री करताना आढळून आल्यास कृषी केंद्रचालकांवर तसेच सीबिल स्कोअर तपासून पीककर्जासाठी अडवणूक करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी सूचना आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शुक्रवारी (ता. २६) जिल्हा प्रशासनाला केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री डॉ. सावंत बोलत होते. या वेळी खासदार संजय जाधव, आमदार विप्लव बजोरिया, सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, मेघना साकोरे-बोर्डीकर, रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलिस अधीक्षक रागसुधा आर., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी रश्मी खांडेकर आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, की ‘एल निनो’चा पर्जन्यमानावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी शेतीपंपांना वीजपुरवठ्यासाठी तत्काळ रोहित्र उपलब्ध करून द्यावेत.

जळालेले रोहित्र तत्काळ बदलून द्यावेत. त्यासाठी लागणारे आगाऊ ऑइल उपलब्ध करून घ्यावे. ही कार्यवाही विनाविलंब करताना वीजजोडणी प्रक्रिया युद्धपातळीवर राबवावी. जलयुक्त शिवार अभियान २.० ची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे डॉ. सावंत म्हणाले.

कृषी विभागाने फळबाग लागवड, शेततळे, अस्तरीकरण, सौर कृषिपंप आदी योजनांबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी. राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींवर कृषी अधिकारी, सहायक आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि योजना, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३५४ कोटी रुपये अर्थसंकल्पित...

सन २०२२-२३ करिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मार्च-२०२३ अखेरपर्यंत एकूण ३१३ कोटी २३ लाख २९ हजार असा १०० टक्के निधी खर्च झाला.

सन २०२३-२४ करिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक उपयोजनेअंतर्गत २९० कोटी, आदिवासी योजनेअंतर्गत २ कोटी २३ लाख ६३ हजार आणि अनुसूचित जाती योजनेअंतर्गत ६२ कोटी याप्रमाणे एकूण रुपये ३५४ कोटी २३ लाख ६३ हजार एवढा नियतव्यय अर्थसंकल्पित असून त्यापैकी आजपर्यंत २९ कोटी २२ लाख ३६ हजार रुपये इतका निधी शासनाने बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करुन दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PMMSY Subsidy Scheme: मत्स्यपालनासाठी सरकार देतंय ६० टक्क्यांपर्यंत अनुदान; जाणून घ्या योजनेची 'A To Z' माहिती.

Tillage Implements: रब्बी हंगामाच्या मशागतीसाठी महत्त्वाचे यंत्र आणि अवजारे

Farmers Death : दोन महिन्यांत २ हजारहून अधिक शेतकरी आत्महत्या, पण राज्यकर्ते ढुंकून बघायला तयार नाहीत, शरद पवारांची जोरदार टीका

Agrowon Podcast: टोमॅटो दरात चढ उतार; कांदा दर दबावात, सोयाबीनचे दर कमीच, गवारला चांगला उठाव तर गव्हाचे भाव स्थिर

Agriculture Status: देशात पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणार! केंद्र सरकार सकारात्मक

SCROLL FOR NEXT