Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : अर्धवट ‘एफआरपी’ देण्यात मराठवाड्यातील कारखाने आघाडीवर

Raju Shetti : ज्यांनी अर्धवट एफआरपी दिलेली आहे. त्यांच्याकडील उर्वरित रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. यामध्ये मराठवाड्यातील कारखाने आघाडीवर आहेत.

Team Agrowon

Jalna News : ज्यांनी अर्धवट एफआरपी दिलेली आहे. त्यांच्याकडील उर्वरित रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. यामध्ये मराठवाड्यातील कारखाने आघाडीवर आहेत. त्यामुळे मराठवाड्यात मोठे दोन-तीन शेतकरी मेळावे घेऊन याविषयी ऊस उत्पादकांना जागृत केले जाईल. उर्वरित एफआरपीची रक्कम व्याजासह वसूल केल्याशिवाय आपण मराठवाड्यातील साखर कारखानदारांना सोडणार नसल्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी या वेळी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी हे गेल्या चार दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर आहेत. स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या निवासस्थानी श्री. शेट्टी यांनी शनिवारी (ता. १२) पत्रकारांशी संवाद साधला. श्री. शेट्टी म्हणाले, की माणिकराव कोकाटे सारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवू नये.

उपमुख्यमंत्री पवार यांनी समज दिल्यानंतरही त्यांचे बेताल वक्तव्य थांबले नाही. श्री. कोकाटे यांनी केंद्रात जाऊन जे आयात शुल्क आता शून्य टक्क्यावर आणले ते जर दोन महिन्यांपूर्वी आणला असते तर संपूर्ण कांदा जगाच्या बाजारामध्ये विकला गेला असता. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हे सरकारने दिलेला आश्‍वासन होते.

अजित पवार आता म्हणतात, की कर्जमाफीसाठी राज्याची आर्थिक स्थिती ठीक नाही. सलग ११ वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजित पवारांना निवडणुकीत आश्‍वासन देताना त्याची जाणीव नव्हती का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

श्री. शेट्टी म्हणाले, की गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी विना कपात एफाआरपी देण्याचा आदेश दिला आहे. राज्य शासनाचा २०२२ चा निर्णय रद्द केला. त्यामुळे ज्या साखर कारखान्यानी आतापर्यंत एकरकमी एफआरपी दिलेली नाही त्यांच्यावर साखर आयुक्तांकडे पाठपुरावा करून आरआरसीची कारवाई करायला लावलीच असल्याचे श्री. शेट्टी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT