Sugarcane Farmer Sangli  agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farmer Sangli : सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, क्रांती कारखान्याची अल्कोहोल अडवली

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात काल (दि. १०) ताकारी येथे क्रांती कारखान्याचे ट्रक रोखले.

sandeep Shirguppe

Sangli Farmers News : मागच्या वर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हफ्ता ४०० रुपये द्या. तसेच सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे इलेक्ट्रीक करा यामागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्य भरात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान याची ठिणगी आता सांगली जिल्ह्यातही पडली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात काल (दि. १०) ताकारी येथे क्रांती कारखान्याचे ट्रक रोखले. क्रांती कारखान्यात उत्पादीत झालेली दारू घेऊन चार ट्रक मुंबई येथील बंदराकडे निघाले होते. ते परत पाठवण्यात आले.

यावेळी वाळवा तालुका अक्ष्यक्ष भागवत जाधव म्हणाल की, २ ऑक्टोबरपासून माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनानुसार आम्ही सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाचा दुसरा हफ्ता ४०० रूपये द्या असे आवाहन केले होते.

यावर निर्णय न झाल्यास कारखान्यातून बाहेर पडणारी साखर आणि उपपदार्थ अडवणार असल्याचा इशारा दिला होता. दरम्यान क्रांती कारखान्याकडून कोणताही निर्णय न होता ते कारखान्यातील उपपदार्थ वाहनातून बाहेर घेऊन जात होते. याबाबत स्वाभिमानीच्यावतीने क्रांती कारखान्याचा अल्कोहोलचा ट्रक अडवून पुन्हा कारखान्यात पाठवून दिल्याची माहिती भागवत जाधव यांनी दिली.

कारखानदारांनी गत हंगामातील उसाला आणखी ४०० रुपये द्यावेत या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १३ सप्टेबर रोजी कोल्हापूर येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी महात्मा गांधी जयंती दिवशी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यावर जाऊन स्वाभिमानीकडून ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते.

मागण्या मान्य झाल्या नाहीतर कारखान्यातून बाहेर पडणारी साखर, इतर उत्पादीत पदार्थ रोखण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मात्र, कारखानदारांनी ती मागणी बेदखल केली. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यातील साखर मागे पाठवण्यात आली आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव, प्रवक्ते ऍड एस.यू.संदे , जगन्नाथ भोसले, अनिल करळे, प्रताप पाटील, पंडित सपकाळ, बाबुराव शिंदे, सचिन यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी क्रांती कारखान्याचे ट्रक रोखून पाठीमागे पाठवले. मागण्या मान्य झाल्या नाहीतर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT