Sustainable Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Farming: शाश्वत शेती दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार

MS Swaminathan: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘शाश्वत शेती दिन’ साजरा करण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि हवामान बदलाला अनुकूल शेती तंत्रज्ञानावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

Team Agrowon

Latur News: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी महाविद्यालयात गुरुवारी (ता. सात) हरितक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन करुन शाश्वत शेती दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्त गणेश जगताप, दीपक मुंडे, अनुसया फड, संदीपान देशमुख, नामदेव चव्हाण, ज्ञानेश्वर कातळे, राम पाटील, शिवराज व्यवहारे, संतोष पाटील, हनुमंत शिंदे, बाळासाहेब कातळे व बालाजी भोसले या शेतकऱ्यांना शेतीतील योगदानाबद्दल प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. 

कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे अध्यक्षस्थानी होते. कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा कृषी अधिकारी व आत्माचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, जिल्हा कृषी अधिकारी दीपक सुपेकर व डॉ. व्यंकट जगताप यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.  डॉ. ठोंबरे यांनी डॉ. स्वामिनाथन यांच्या जीवन कार्याची माहिती  देत त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती बरोबर शाश्वत स्वावलंबन येण्यासाठी मौलिक योगदान दिल्याचे सांगितले.

ग्राम बीजोत्पादन, पारंपारिक शेती व आधुनिक तंत्रज्ञान याचा सुवर्णमध्य साधण्याचे कार्य जगभर केले व भारतीय शेतीला आकार देण्याचे महान कार्य केले. देशाच्या भूकमुक्तीचा ध्यास घेतला होता. शेतकरी बियाण्यांच्या बाबतीत स्वावलंबी असला पाहिजे त्यासाठी ते जागरूक होते, असेही डॉ. ठोंबरे यांनी सांगितले. 

श्री. दिवेकर यांनी हवामान बदलाला अनुकूल शेती विकसित करणे आवश्यक असून त्यासाठी कृषी क्षेत्रातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली. डॉ. विजय भामरे यांनी मित्र किडी, डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी हाराकी तंत्रज्ञान तर डॉ. ज्योती देशमुख यांनी विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतावरी या विषयावर मार्गदर्शन केले.

या  वेळी डॉ. राजेश शेळके, मोहन गोजमगुंडे, डॉ. दयानंद मोरे, डॉ. अनंत शिंदे, डॉ. प्रभाकर आडसूळ, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, सचिन हिंदोळे, विशाल जगताप व रणजित चव्हाण यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा कृषी अधिकारी लाडके यांनी प्रास्ताविक केले. मनीषा बांगर यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Business Ideas: शेतकऱ्यांनी शेतमालाच्या मूल्यवर्धनातून उद्योजक व्हावे

School Fees Dispute: शुल्क थकीत असल्यास शाळेतून काढणे बेकायदेशीर

MGNREGA Scheme Issue: सेनगाव तालुक्यात मनरेगा अंतर्गत विहीर कामाच्या निधीचा अपहार

Farm Tools Distribution: कृषिरत महिला संशोधन केंद्रातर्फे गांडूळ, अॅझोला निर्मिती साधनांचे वाटप

Fake Fertilizer: कोपरगाव तालुक्यात महिनाभरात बनावट खतप्रकरणी पाच कारवाया

SCROLL FOR NEXT