Tehsildar Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : ‘पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून विमा परतावा मिळवून द्या’

Crop Damage Compensation : नुकसानीचा तातडीने सर्व्हे करून शेतकऱ्यांना विमा परतावा मिळवून द्यावा, अशी मागणी प्रगती शेतकरी मंडळाने केली आहे. याबाबत तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठवण्यात आले.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यात सोमवारी (ता.२६) सायंकाळी अवकाळी पाऊस व काही भागात झालेल्या गारपिटीने शेतातील उभी, कापणी झालेले व गंजी मारलेल्या हरभरा, तूर, गहू या पिकांसह भाजीपाला फळबागांचे नुकसान झाले आहे.

या नुकसानीचा तातडीने सर्व्हे करून शेतकऱ्यांना विमा परतावा मिळवून द्यावा, अशी मागणी प्रगती शेतकरी मंडळाने केली आहे. याबाबत तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठवण्यात आले.

पीक कापणीपश्चात पिकाला पीक विम्याचे संरक्षण असून पीक विम्याचे क्लेम व्हावेत यासाठी महसूल, कृषी व विमा कंपनीला ताबडतोब सर्व्हेक्षण करण्याचे आदेश द्यावे. शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळवून द्यावा अशी मागणी या निवदेनात जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप ,यंग बॉइज क्लब आदींच्या वतीने करण्यात आली.

या निवेदनावर राजू वानखडे, प्रा सुधाकर गौरखेडे ,आनंद बांगड, कैलास साबळे ,मुन्ना नाईक नवरे ,सागर मानकर ,सागर ढोरे ,श्रीकांत वानखडे,चंदु वानखडे, कृष्णा गावंडे,सेवकराम लहाने,दत्ता वानखडे, प्रमोद राजंदेकर ,विश्वनाथ सावळे, दिगंबर जाधव, शरद बंग, एकनाथ पाटील इंगोले ,

राम ठोकळ, निलेश मेहरे, प्रफुल्ल मालधुरे ,जीवन देशमुख, राजू काळे, सुरेश गवई ,बाळूभाऊ मते, गिरीश चतुरकर, सचिन पवार, निखील घाटे, गोपाल तायडे, अमोल गिरी, संजय खरबडकर, गजानन काळे, नंदकिशोर बभानीया, आशिष लोडम, अंगदराव आटोटे, माधवराव काळे अरुण बोंडे यांच्या साक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT