Chemical-Fertilizer
Chemical-Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Seed, Fertilizer Supply : दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करा

Team Agrowon

Fertilizer Supply In Sangli News : शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा, रासायनिक खते, कीटकनाशके वेळेत व वाजवी दरामध्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये कोणतीही समस्या उद्‍भवणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री सुरेश खाडे (Minister Suresh Khade) यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत दिल्या.

पालकमंत्री खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार उपस्थित होते.

बैठकीत हुमनी कीड व्यवस्थापन, मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेसंदर्भात तयार करण्यात आलेल्या भित्तिपत्रिकेचे अनावरण झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.

पालकमंत्री खाडे म्हणाले, की जलसंपदा विभागाने समाधानकारक पाऊस पडेपर्यंत सर्व उपसा सिंचन योजना सुरू ठेवाव्यात. विजेअभावी पिकांचे नुकसान होऊ नये व उपसा सिंचना योजना या कालावधीत सुरू राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा अखंडित राहील, याची दक्षता घ्यावी.

कृषी विभागाचे खरिपासाठी सूक्ष्म नियोजनाबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार म्हणाले, की खरिपासाठी ३८ हजार १७ क्विंटल बियाणांची मागणी केली.

त्यात भात पिकाचे ६ हजार ७३२, ज्वारी ५ हजार ६६५, बाजरी २ हजार २०, तूर ६२१, मूग २४७, उडीद ८५१, भुईमूग १ हजार ४६८, सूर्यफूल १२९, सोयाबीन १३ हजार ५८६, मका ६ हजार ६९८ क्विंटलचा समावेश आहे.

खरिपासाठी १ लाख ८९ हजार ३५४ टन खतांची मागणी केली आहे. त्यात युरिया ५२ हजार १०० टन, डी.ए.पी. २० हजार ८९१ टन. एम.ओ.पी. २१ हजार १७५ टन, एस.एस.पी. ३० हजार २८६ टन आणि संयुक्त खतांचा ६४ हजार ९०२ टनांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT