Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : घुंगशी प्रकल्पावरून सिंचनासाठी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा

Water Supply : खारपाण पट्ट्यात हंगामी सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू पाहणाऱ्या घुंगशी प्रकल्पावरील जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठ्याच्या प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक एकची शुक्रवारी (ता.१५) चाचणी घेण्यात आली.

Team Agrowon

Akola News : खारपाण पट्ट्यात हंगामी सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू पाहणाऱ्या घुंगशी प्रकल्पावरील जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठ्याच्या प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक एकची शुक्रवारी (ता.१५) चाचणी घेण्यात आली. यामुळे घुंगशी प्रकल्प क्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळू शकणार आहे.

खारपाण पट्ट्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेत गेल्या काळात शासनाने याला पाठबळ दिले. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार अनुप धोत्रे तसेच आ. रणधीर सावरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर कामाला गती मिळाली होती.

प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याची चाचणी झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी भेट घेत सावरकरांकडे आभार व्यक्त केले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी बंद पाइपमधून पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या टप्पा-१ ची चाचणी शुक्रवारी यशस्वीपणे पार पडली. प्रत्यक्ष शेतापर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या बंद पाइपलाइन जाळ्यांची टप्पा-२ ची चाचणी २०२४ अखेर होणार होती.

ती आता पूर्ण होऊन शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामात पाणी उपलब्ध होणार असल्याने लाभक्षेत्रातील तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. राजेश बेले, अनिल गावंडे, दिगंबर गावंडे, हिम्मत गावंडे, प्रमोद गावंडे, प्रमोद देशमुख, सुरेश देशमुख, शरद कराळे यांच्यासह इतर शेतकरी यावेळी उपस्थित होते.

पूर्णा नदीवरील घुगंशी बॅरेज प्रकल्पातून मारोडी, आपातापा, अपोती खुर्द, आपोती बुद्रूक, दापुरा, कौलखेड, मजलापूर, जलालाबाद अंबिकापूर, गोणापूर, म्हैसांग, कटयार, वडद, कपिलेश्वर, एकलारा व दोनवाडा या १६ गावांमधील १२ हजार ९९८ एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT