Fertilizers Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizers Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील खतांचा पुरवठा कृषी विभागाने केला जाहीर

Minister Prakash Abitkar : मंजूर खतसाठ्या प्रमाणे जिल्ह्यात खताची पुरेशी उपलब्धतता करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी सारिका रेपे यांनी दिली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सन २०२४-२५ रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यासाठी खतांची उपलब्धता व वाटपाबाबत नियोजन करण्यात आले आहे. मंजूर खतसाठ्या प्रमाणे जिल्ह्यात खताची पुरेशी उपलब्धतता करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी सारिका रेपे यांनी दिली आहे.

दरम्यान कृषी अधिकारी रेपे यांनी दिलेल्या जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहितीनुसार रब्बी हंगामातील मंजूर खतसाठा (३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत खताची उपलब्धतता) याची आकडेवारी मेट्रीक टनामध्ये युरिया ५५६४९ (३१७७२), डिएपी १३२६३ (९४८४), एमओपी ११४४९ (७१३६), संयुक्त खते ५१४६० (२५८२६), एसएसपी ३१८२४ (११००९), एकूण खते १६३६४५ (८५२९५) टन याप्रमाणे आहे.

या खतापैकी ३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत जिल्ह्यामध्ये शिल्लक खतसाठा पुढीलप्रमाणे- युरिया १६१४३, डिएपी-३४१०, एमओपी -४२५५ संयुक्त खते - १६०७४, एसएसपी - ६८१३ एकूण शिल्लक खते - ४६७५७ मेट्रीक टन आहे. यापुढेही जिल्ह्यास गुणवत्तापूर्ण व मुबलक पुरवठा होईल असे नियोजन करण्यात आल्याचे कृषी अधिकारी रेपे यांनी सांगितले.

मंत्री आबिटकर यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

‘‘शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून खत उत्पादक कंपन्यांनी लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी अधिकाऱ्यांनी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन कठोर कारवाई करावी. भविष्यात जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक पुरवठा होईल, असे नियोजन खत उत्पादक कंपन्या आणि कृषी विभागाने करावे. दुर्गम भागात सर्व खतांचा मुबलक पुरवठा होईल, याचीही खबरदारी घ्यावी.’’ अशा सूचना मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दिल्या होत्या. दरम्यान, मंत्री आबिटकर यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृषी विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?

Semiconductor Chip : आली पहिली 'मेड इन इंडिया' चिप! शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Marathwada Flood: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; पंचनाम्यांना विलंब

Genome Paddy Variety : भारताने विकसित केलेल्या जगातील पहिल्या जिनोम संपादित भात वाणाची काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT