Water Tanker Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : माढा तालुक्यात १५ गावांना टँकरने पुरवठा

Water Scarcity : माढा तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १५ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Team Agrowon

Solapur News : माढा तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १५ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाऊस पडेपर्यंत पुढील एक ते दीड महिन्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत.

यंदाचा उन्हाळा कडक असून, वातावरणाच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. गावातील विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. उजनी धरण तर वजा ५० टक्क्यांपर्यंत पोचत आहे. त्यामुळे सध्या नदी, ओढ्यात पाण्याचा थेंबही नाही. ग्रामीण भागात अनेक ठिकाणची जलजीवन मिशनची कामे अर्धवट स्थितीत असल्याचे दिसत आहे.

प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून आतापर्यंत माढा तालुक्यातील १५ गावांना १६ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. तीन गावांची टँकरची मागणी प्रस्तावित आहे; तेही लवकरच मंजुरी मिळाली की सुरू होतील. दोन गावांत विंधन विहिरी अधिग्रहण केल्या असून, तीन गावांतील विंधन विहिरींचे अधिग्रहणाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. तसेच सध्याची पाण्याची गंभीर परिस्थिती पाहता पुढील काही दिवसांत अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

शासनाकडे वडाचीवाडी (त म), मानेगाव, पिंपळखुटे या गावांतून टँकरचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. दारफळ व मानेगाव येथे प्रत्येकी एक विंधन विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर जाधववाडी (मा), चिंचोली व रणदिवेवाडी या गावांतील विंधन विहिरी अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव आहेत.

टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेली गावे

भोसरे, कुर्डू, घाटणे, बावी, बैरागवाडी, परितेवाडी, शिराळ (मा), अरण, अंजनगाव (खे), रोपळे (क), पडसाळी, जाधववाडी (मो), मोडनिंब, वडाचीवाडी (अऊ) येथे प्रत्येकी एक टँकर व तुळशी येथे दोन टँकर सुरू आहेत.

माढा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त १५ गावांत १६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तीन गावांतून टँकर मागणीचे प्रस्ताव आले आहेत. प्रस्ताव मंजूर झालेल्या गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
दयानंद वाघमारे, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, माढा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT