Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Supply : मे महिन्याअखेर सर्व खतांचा पुरवठा करा

मे महिन्याअखेर सर्व खताचा पुरवठा करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी खते व बियाणे यांची विनापरवाना विक्री केली जाते, अशा ठिकाणी तत्काळ संबंधित तालुक्याच्या तक्रार निवारण समिती किंवा भरारी पथकाला माहिती देण्यात आली आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : मे महिन्याअखेर सर्व खताचा पुरवठा (Fertilizer Supply) करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी खते व बियाणे यांची विनापरवाना विक्री केली जाते, अशा ठिकाणी तत्काळ संबंधित तालुक्याच्या तक्रार निवारण समिती किंवा भरारी पथकाला माहिती देण्यात आली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती सुनंदा कुऱ्हाडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेते तसेच उत्पादक कंपनी यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी सुनंदा कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली. या सभेमध्ये खरीप हंगामासाठी लागणारे भात व नाचणी बियाणे पुरवठाबाबत चर्चा झाली.

तसेच भात पिकासाठी लागणाऱ्‍या खतांमध्ये महत्त्वाचे असणारे युरिया खताच्या पुरवठ्याबाबत आरसीएफ कंपनीच्या प्रतिनिधी समवेत नियोजन करण्यात आहे. मे महिन्याअखेर सर्व खताचा पुरवठा करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ज्या ठिकाणी खते व बियाणे यांची विनापरवाना विक्री केली जाते, अशा ठिकाणी तत्काळ संबंधित तालुक्याच्या तक्रार निवारण समिती किंवा भरारी पथकाला माहिती देण्याबाबत आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या निविष्ठांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी जिल्ह्यातील निरीक्षकांना सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी करणे तसेच आलेल्या निविष्ठांचे नमुने घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

सर्व परवानाधारकांनी निविष्ठा विक्री संदर्भात कायद्यातील नियमांचे पालन करण्याबाबत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या निविष्ठा वेळेत पुरवण्याबाबत सूचना सभेमध्ये देण्यात आल्या. कृषी सेवा केंद्रांनी कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

बियाणे, खते व कीटकनाशके यांचे जिल्ह्यातून विविध विक्री केंद्रामधून घेतलेल्या नमुन्यांपैकी अप्रमाणित नमुने असलेल्या विक्री व उत्पादन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध तीन कोर्ट केसेसही दाखल आहेत.

या सभेसाठी कृषी विकास अधिकारी अजय शेंडे, भात संशोधन केंद्र प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी, कृषी अधिकारी श्री पोकळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सागर साळुंखे, जिल्हा अध्यक्ष माफदा बाबा दळी, तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक, खत उत्पादक कंपनी आरसीएफ, इफको व एमएआयडीसी यांचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सर्व खते, बियाणे विक्रेते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT