Sunflower  Agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Farming : वाठार हिमातील शेतकऱ्याची २० गुंठ्यांत सूर्यफूल शेती

Sunflower Cultivation : भोर तालुक्याच्या पश्चिम भागात भात शेतीनंतर आता खाचरात सूर्यफूल पीक फुलले आहे

Team Agrowon

Pune News : भोर तालुक्याच्या पश्चिम भागात भात शेतीनंतर आता खाचरात सूर्यफूल पीक फुलले आहे. नीरा देवघर धरणाखालील गावातून सध्या काही शेतकरी उन्हाळी पिके घेत आहेत. त्यातील वाठार हिमा (ता. भोर ) येथील शेतकरी भरत खाटपे यांनी २० गुंठ्यांत सूर्यफुलाची शेती केली आहे.

सूर्यफुलाची टोकण पद्धतीने लागवड करताना ६० सें. मी. बाय ३० सें. मी. अंतरावर टोकण केले. पेरणीनंतर १५ दिवसांनी दोन रोपांतील अंतर ३० सें. मी. ठेऊन विरळणी आणि खुरपणी केल्याने तणांचा नाश झाला.

त्यामुळे पीक जोमदार आले. पेरणीनंतर पहिली कोळपणी २५ दिवसांनी व दुसरी कोळपणी ४० दिवसांनी केली. दर आठ दिवसांनी पाणी दिले. रासायनिक खतांचा संतुलित वापर केला.

भात पिकाच्या तुलनेत या पिकांना कमी पाणी लागत असल्याने तसेच या पिकावर हवामान बदलाचा विपरीत प्रादुर्भाव पाहायला मिळत नसल्याने या पिकाची लागवड फायदेशीर ठरली आहे. या पिकातून साधारणतः ७० हजार रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

भात पीक घेतल्यानंतर कोणतेच पीक घेत नव्हतो. परंतु यावर्षी सूर्यफुलाचे पीक प्रायोगिक तत्त्वावर घेतले आहे. या पिकाला उतारा चांगला असल्याने आर्थिक उत्पन्न चांगले मिळू शकते.
- भरत खाटपे, शेतकरी, वाठार हिमा, ता. भोर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT